तरुण भारत

मुंबईच्या माजी महिला क्रिकेटपटू रंजिता राणे यांचे निधन

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबईची माजी महिला क्रिकेटपटू रंजिता राणे यांचे बुधवारी कर्करोगाने निधन झाले. त्या 43 वर्षांच्या होत्या. 1995 ते 2003 या कालावधीत त्यांनी मुंबईतर्फे 44 प्रथमश्रेणी सामन्यांत भाग घेतला होता.

Advertisements

स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी त्यांना टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या अष्टपैलू क्रिकेटपटू होत्या. त्या मध्यमगती गोलंदाजी करायच्या. 2016 मध्ये एमसीए स्कोअरिंग परीक्षा पास झाल्यानंतर 2017 पासून त्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या स्कोअरर बनल्या होत्या. कर्करोगावर महागडे उपचार करण्यासाठी एमसीएने त्यांना मोठी आर्थिक मदत केली होती. याशिवाय डायना एडलजी यांनीही त्यांना दोन-तीन वर्षापूर्वी सिद्धिविनायक ट्रस्टकडून उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली होती. मुंबई, बॉम्बे युनिव्हर्सिटी व इंडियन जिमखाना या संघांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते.

Related Stories

बलाढय़ मुंबईला रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान

Patil_p

न्यूझीलंडची बांगलादेशवर मात

Patil_p

सुवारेझचा बार्सिलोना बरोबरचा करार समाप्त

Patil_p

नवल टाटा हॉकी अकादमीला माजी हॉकीपटूंची भेट

Patil_p

सहा आठवडय़ांच्या प्रशिक्षण शिबिरात धोनी सहभागी होणार का?

Patil_p

अँडरसनचे 5 बळी, सिबलीचे नाबाद अर्धशतक,

Patil_p
error: Content is protected !!