तरुण भारत

देशात मागील 24 तासात 2.11 लाख नवीन कोरोना रुग्ण; 3,842 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


देशात मागील 24 तासात देशात 2 लाख 11 हजार 298 नवे रुग्ण आढळून आले. तर 3,847 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 कोटी 73 लाख 69 हजार 093 वर पोहचली आहे. 

Advertisements


देशात दुसऱ्या लाटेत कोरोना संकट हे अधिक गडद होताना दिसत आहे. बुधवारी देशात 2 लाख 83 हजार 135 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर  आतापर्यंत 2 कोटी 46 लाख 33 हजार 951 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


सध्या देशात 24 लाख 19 हजार 907 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात मृतांची एकूण संख्या 3 लाख 15 हजार 235 एवढी आहे. दरम्यान आतापर्यंत देशातील 20 कोटी 26 लाख 95 हजार 874 जणांना लस देण्यात आली आहे. 

आतापर्यंत देशात 33 कोटी 69 लाख 69 हजार 352 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 21 लाख 57 हजार 857 कोरोना चाचण्या बुधवारी (दि. 26 मे 2021) एका दिवसात करण्यात आल्या. 

Related Stories

आज पंतप्रधान मोदींचे व्हिवा टेकला संबोधन

Patil_p

दुर्गम भागात ड्रोनद्वारे लसपुरवठा

Patil_p

विश्वभारती विद्यापीठाला नोटीस

Patil_p

भाजपच्या प्रचारात व्हिडीओचा घोळ

Patil_p

देशात पाच दिवसात 2 लाख बाधित रुग्ण

datta jadhav

लाल किल्ला हिंसाचार -इक्बाल सिंगला अटक

Patil_p
error: Content is protected !!