तरुण भारत

औद्योगिक कामगारांची पोलिसांकडून अडवणूक

वेळेतच कारखान्यांमध्ये पोहोचण्याची सक्ती : काहींना माघारी पाठवत असल्याने पुन्हा उद्योग अडचणीत

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

अत्यावश्यक सेवांशी निगडित उद्योग सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी कामगारांच्या येण्या-जाण्याच्या वेळांवर निर्बंध येत आहेत. दोन शिफ्टमध्ये काम सुरू असले तरी कामगारांची येता-जाता पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. काही कामगारांना पोलीस माघारीही पाठवित असल्याने पुन्हा एकदा उद्योग अडचणीत आले आहेत.

उद्योगांना परवानगी देताना दोन शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 7 पहिली शिफ्ट तर सायंकाळी 7 ते सकाळी 8 यावेळेत दुसरी शिफ्ट सुरू आहे. सकाळच्या शिफ्टला येणाऱया कामगारांना 8 पूर्वी कंपनीमध्ये पोहोचावे लागत आहे. 8 नंतर कारखान्याकडे जाणाऱया कामगारांची पोलिसांकडून अडवणूक केली जात आहे. मंगळवारी तिसरे रेल्वेगेट येथे काही कामगारांची सकाळी 9 वा. अडवणूक करण्यात आली. आठनंतर कोणालाही ये-जा करू दिले जाणार नाही, असा पवित्रा घेत पोलिसांनी कामगारांना माघारी पाठविले.

उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कारखान्यात राहून काम करणे अशक्मय असते. प्रोग्रामिंग तसेच इतर कामांसाठी इतर ठिकाणी जाणे-येणे गरजेचे असते. परंतु पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याने काम थांबत आहे. इतर पूरक साहित्य मिळविण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. त्यामुळे उद्योजकांना तारेवरची कसरत करून उद्योग सुरू ठेवावे लागत आहेत. या समस्या पाहून अनेकांनी कामगारांना अजून काही दिवस सुटी घेण्यास सांगितले आहे.

विनाकारण फिरणाऱया कामगारांवर कारवाई योग्यच

उद्योग सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली असल्याने दिलेल्या वेळेनुसार काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिफ्टपूर्वी कामावर हजर राहणे आवश्यक आहे. कारखान्यांनी ओळखपत्र दिल्यामुळे ती गळय़ात घालून फिरणाऱयांची संख्याही वाढली आहे. पोलिसांनी विचारल्यास कंपनीला जात असल्याचे कारण देण्यात येत आहे. असे प्रकारही समोर येत असल्याने अशा कामगारांवर केलेली कारवाई ही योग्यच असल्याचे मत उद्योजक व्यक्त करीत आहेत.

Related Stories

कुडची येथील आणखी तिघांना कोरोनाची लागण

Rohan_P

आता अंत्यसंस्कारासाठीही वेटिंग…

Patil_p

दिवाळीत कर्नाटकात फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी

Abhijeet Shinde

सीमा लाटकर यांची बदली अखेर रद्द

Patil_p

हस्ताने शहर-उपनगरांना झोडपले

Patil_p

प्रियांका अक्कोळे हिचा सत्कार

Patil_p
error: Content is protected !!