तरुण भारत

बुधवारी 1300 नवे रुग्ण; 14 जण दगावले

प्रतिनिधी / बेळगाव

बुधवारी बेळगाव जिल्हय़ात 1300 हून अधिक नवे रुग्ण आढळून आले असून 14 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका बेळगाव तालुक्मयातील 5 जणांचा समावेश आहे. एका बेळगाव तालुक्मयात 481 नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे इस्पितळात बेड नाहीत, ऑक्सिजन नाही असे सांगितले जात असतानाच रुग्णसंख्या मात्र झपाटय़ाने वाढत चालली आहे. 692 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

Advertisements

जिल्हा प्रशासन व सरकारी यंत्रणा परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे सामोरे आले आहे. लोक शिव्याशाप देत मिळेल तेथे उपचार घेत आहेत. चार दिवसांपूर्वी बेड, ऑक्सिजन वेळेत मिळाले नाही म्हणून संजीव नाडगेर या पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. ते हृदयरोगाने त्रस्त होते. वेळेत ऑक्सिजन मिळाले नाही म्हणून त्यांचा मृत्यू झाला आहे. यासंबंधी बिम्स प्रशासनावर सोशल मीडियावर टिकेची झोड उठली आहे.

जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 60 हजार 311 वर पोहोचली आहे. बुधवारी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवरचा मृतांचा आकडा 497 वर पोहोचला असून बेळगाव तालुक्मयातील 5, अथणी तालुक्मयातील 2, गोकाक तालुक्मयातील 3, खानापूर, चिकोडी, बैलहोंगल, रायबाग तालुक्मयातील प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे. अद्याप 18 हजार 332 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळी इस्पितळे व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहेत. लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.

पिरनवाडी, येळ्ळूर, होनगा, मारिहाळ, धामणे, मच्छे, सांबरा, सरस्वतीनगर-गणेशपूर, देसूर, मुतगा, अष्टे, हुलीकवी, मोदगा, हिरेबागेवाडी, विजयनगर, पंतबाळेकुंद्री, अरळीकट्टी, मारिहाळ,

बेकिनकेरे, हलगा, गजपती, बस्सापूर, मुत्नाळ, कंग्राळी बी. के., कंग्राळी खुर्द, काकती, बडस परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

खासबाग, रेव्हेन्यू कॉलनी, सदाशिवनगर, वडगाव, शहापूर, शाहूनगर, शास्त्राrनगर, हनुमाननगर, हिंडलगा, अनगोळ, हिंदवाडी, मुचंडी, व्हॅक्सिन डेपो, जाधवनगर, केएचबी कॉलनी, मजगाव, कंग्राळ गल्ली, खडेबाजार, कणबर्गी, क्लब रोड, चव्हाट गल्ली, गुरुप्रसाद कॉलनी, शेरी गल्ली, शिवबसवनगर, श्रीनगर, टीचर्स कॉलनी, वंटमुरी, वीरभद्रनगर, विनायकनगर, के. के. कोप्प, झटपट कॉलनी-अनगोळ परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत.

बडस, आनंदवाडी-शहापूर, अंजनेयनगर, संगमेश्वरनगर, आझमनगर, बडाल अंकलगी, भाग्यनगर, पाटील गल्ली-बेळगाव, मणगुत्ती, वैभवनगर, शांतीनगर, वंटमुरी कॉलनी, पोलीस हेडक्वॉर्टर्स, राणी चन्नम्मानगर, रामनगर, रामतीर्थनगर, बसवाण गल्ली, बिम्स कॅम्पस, कॅम्प, चौगुलेवाडी, महादेव गल्ली, महांतेशनगर, महात्मा फुले रोड, मुजावर गल्ली, नाझर कॅम्प-वडगाव, ओमनगर, न्यू गुड्सशेड रोड परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

बेळगावमध्ये 27 ठिकाणी पार पडली टीईटी परीक्षा

Amit Kulkarni

बेळगावातील 521 तपासणीच्या अहवालांची प्रतीक्षा

Rohan_P

सुवर्णसौधमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करा

Patil_p

कोल्हापूर निपाणी बससेवा बंद

Rohan_P

जमखंडीजवळ दुतोंडी साप विकणाऱ्या तरुणाला अटक

Rohan_P

आयटीआय कॉलेजचा प्राचार्य एसीबीच्या जाळय़ात

Omkar B
error: Content is protected !!