तरुण भारत

टॉन्सिलायटीसचा सामना करताना

घशाला कोरड ही सर्वसामान्य समस्या आहे आणि ती कोणत्याही हंगामात होऊ शकते. एकीकीडे उन्हाळ्यात उष्णतेमुळे आणि घाम येत असल्याने घशाला कोरड पडते. त्यामुळे सतत थंडगार पाणी प्यावेसे वाटते. दुसरीकडे थंडीच्या काळात घाम येत नाही आणि त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी राहते. मात्र थंडीच्या दिवसात हवामान कोरडे असल्याने शुष्क हवा आतमध्ये गेल्यानंतर घसा कोरडा पडतो.

  • शरीराच्या स्पायनल डिस्क आणि कार्टिलेजमध्ये 80 टक्के पाणी असते. अशावेळी शरिरात पाणी कमी राहिल्यास संबंधित व्यक्तीच्या
  • शारिरीक हालचालीवर विपरित परिणाम होतो आणि मेंदूचे कार्य देखील मंदावते. विशेषतः सांधेदुखीची समस्या वाढू लागते. जर एखाद्याला अशा प्रकारचा त्रास असेल तर ते काही गंभीर आजाराचे लक्षण देखील राहू शकते.
  • टॉन्सिलाइटिस : घशात मागच्या बाजूला टॉन्सिल्स नावाच्या दोन ग्लॅडस असतात. त्या कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्याचे काम करतात. मात्र त्यात संसर्ग पसरला तर त्यास टॉन्सिलायटिस असे म्हटले जाते. या ग्लॅडमध्ये अनेकदा फंगल इन्फेक्शन होते. यात घसा कोरडा पडण्याबरोबरच गिळण्यास त्रास होतो. त्याचवेळी घसादुखी, कानदुखी आणि ताप येण्यासारखे लक्ष दिसतात.

उपाय

Advertisements
  • घसादुखी होऊ लागली तर अशावेळी औषध घेण्याबरोबरच थंड पदार्थ किंवा पेय न खाण्याचा सल्ला दिला जातो. गरम पाण्याने गुळण्या भरणे किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

लक्षात ठेवा

  • ओरल हायजिनकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कोणताही त्रास होत नसेल तरीही वर्षभरातून एकदा तरी डेंटल चेकअप करणे गरजेचे आहे.
  • अल्कोहोल आणि सिगारेटपासून दूर राहा.
  • लिंबू पाणी प्या, बडिशेप चघळा. यामुळे तोंडात लाळ तयार होण्याची गती वाढेल आणि घसा कोरडा पडणार नाही.
  • आहारात फळ आणि हिरवा भाजीपाल्याचे प्रमाण वाढवावे. यामुळे शरिरातील पाणी संतुलित राहते.

– डॉ. मनोज शिंगाडे

Related Stories

लठ्ठपणा आणि मूग

tarunbharat

कोरोना काळात काय टाळावे

Amit Kulkarni

समस्या स्लिप डिस्कची

Amit Kulkarni

ओळखा कातडीचा कर्करोग

Omkar B

सूर्य मुद्रा

Omkar B

कोरोनाचा ‘दुसरा हल्ला’

Omkar B
error: Content is protected !!