तरुण भारत

आला पावसाळा ओले मास्क टाळा

सध्याचा काळात पाऊस कधीही येऊ शकतो किंवा भूरभूर राहू शकते. अशावेळी काही तासातच आपला मास्क ओला होऊ शकतो. म्हणून घराबाहेर पडणार्या मंडळींनी दोन ते तीन तासांनी मास्क बदलत राहणे गरजेचे आहे.

  • अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडणार्या लोकांनी तीन ते चार मास्क जवळ बाळगावेत.
  • संसर्गाचा धोका ः बुरशीचे संक्रमण वाढण्यास पावसाळी वातावरण पोषक असते. तोंडावर लावलेला मास्क ओला झाला आणि तो जास्त काळ तसाच राहिल्यास त्यातून फंगल इन्फेक्शन वाढू शकते. हे विषाणू मास्कच्या माध्यमातून नाकात प्रवेश करतात.
  • सध्याच्या काळात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ओल्या मास्कमुळे तयार झालेले फंगल इन्फेक्शन हे आपल्या फुफ्सुसापर्यंत पोहोचू शकतात.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओला मास्क हा व्यक्तीचा संसर्गापासून बचाव करु शकत नाही किंवा फारसा प्रभावी राहत नाही. म्हणून तो तात्काळ बदलणे हिताचे ठरु शकते.

उन्हात कोरडा करा मास्कः ङबुरशी संक्रमणाला थारा मिळू नये यासाठी मास्कला काही वेळ उन्हात ठेवा. सामान्य वातावरणात देखील खराब किंवा ओला मास्क वापरु नये. त्यामुळे किमान दोन-तीन मास्क असणे गरजेचे आहे. एकाचा वापर झाल्यानंतर दुसरा उन्हात वाळवता येऊ शकतो.

Advertisements
  • डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर तो आठ तासांनी बदलणे गरजेचे आहे.
  • बल मास्क सुरक्षितः संसर्गापासून वाचण्यासाठी दोन मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. पावसाळी वातावरणामुळे वरचा मास्क ओला होण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे आतील मास्क हा सुरक्षित आणि कोरडा राहू शकतो. कामाच्या ठिकाणी वरचा मास्क काढून ठेवला तरी आतला मास्क संसर्गापासून बचाव करण्याचे काम करतो.

मास्कची स्थिती पहा

  • कपडय़ाचा साधा मास्कः मास्कवर पाणी टाका आणि ते पाण्याला शोषून घेईल.
  • तीन लेअरचा मास्कः त्यावर पाणी पडल्यास ते पाणी आतपर्यंत जात नाही. मास्कच्या आतील लेअर कमी ओले होईल.
  • सर्जिकल मास्क : यावर पाणी टाकले तर सर्जिकल मास्क हा आतमध्ये पाणीच जावू देत नाही.

Related Stories

समस्या रबडोमायलेसीस

Amit Kulkarni

जपावे दंत आरोग्य

Omkar B

डायव्हर्टिक्युलायटिस आणि पथ्याहार

Omkar B

N-95 मास्क कोरोना विषाणूचे संक्रमण रोखू शकत नाही

datta jadhav

कोरोनाचा ‘दुसरा हल्ला’

Omkar B

लॉकडाउन काळात करा तीन सोपे व्यायम

Omkar B
error: Content is protected !!