तरुण भारत

12 वर्षांवरील मुलांसाठी लस तयार; फायझरने मागितली केंद्राकडे फास्ट ट्रॅक मंजुरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या कोरोनाविरोधी लसीकरण मोहिम सर्व स्तरावर राबवली जात आहे. मात्र अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात भारतात कोवॅक्सिन, कोव्हिशील्डनंतर स्पुटनिक आणि फायझर लस येत्या काही दिवसात नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकन फायझर कंपनीने आपल्या कोरोना लसीच्या परिणामकारतेची आणि चाचणीची संपूर्ण माहिती भारताला दिली आहे. 

Advertisements

अमेरिकन फार्मा कंपनी फायझरने दावा केला आहे की, त्यांची लस भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरस विरूद्ध प्रभावी आहे. दरम्यान कंपनीने लस साठवण्याबाबतही चर्चा केली. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान भारताला 5 कोटी डोस देण्यास फायझर तयार आहे. फायझर फार्मा कंपनी देशात फास्ट ट्रॅक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

फायझरने असेही म्हटले आहे की, ही लस 12 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते आणि 1 महिन्यांपर्यंत 2-8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येते. याव्यतिरिक्त, कतारमध्ये राष्ट्रीय स्तरावरील लसीकरण कार्यक्रमात B.1.1.7 व्हेरिएंट विरूद्ध लसीची 89 टक्के जास्त परिणामकारकता दिसून आली आहे. हा व्हेरिएंट आधी ब्रिटनमध्ये आढळला होता. तर, दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या B.1.351 व्हेरिएंट विरूद्ध लस 75 टक्के प्रभावी होती. या अभ्यासात 24 टक्के लोक भारतीय असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, फायझर कंपनीने लसींच्या विक्रीसाठी अमेरिकेसह 116 देशांशी करार केला आहे. फायझर कंपनीने आत्तापर्यंत जगभरात 14.7 कोटी डोस वितरित केले आहे.

सध्या भारतात 20 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाविरोधी लसींचे डोस दिले आहे. यात भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस नागरिकांना दिली जात आहे. यात सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीलाही मान्यता दिली आहे, मात्र अद्याप ही लस अद्याप नागरिकांना दिली जात नाही. यात फायझरची लसही भारतीयांसाठी उपलब्ध झाल्यास कोरोना लसीकरण मोहिम पुन्हा वेगाने सुरु होईल. 

Related Stories

BMC चा मोठा निर्णय; पहिली ते चौथीचे वर्ग बंदच राहणार

datta jadhav

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून हैदोस सुरू : आमदार चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

केंद्र सरकारच्या ‘आरोग्य सेतू’ वर राहुल गांधी यांच्याकडून प्रश्नचिन्ह

Rohan_P

हेमंत शर्मा यांच्याकडून वादग्रस्त टिप्पणी

Amit Kulkarni

ब्रिटिश एअरवेज करणार 12 हजार कर्मचाऱ्यांची कपात

datta jadhav

…म्हणून अदानी पोर्ट ‘या’ देशांचा माल हाताळणार नाही

datta jadhav
error: Content is protected !!