तरुण भारत

कॅलिफोर्नियातील रेल्वे यार्डात गोळीबार; शीख कर्मचाऱ्यासह आठ जण ठार

ऑनलाईन टीम / कॅलिफोर्निया : 


अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील रेल्वे यार्डमध्ये एका कर्मचाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात आठ जण ठार झाले आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली आहे.

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार,  या हल्ल्यात एका शीख व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. सांता क्लारा काउंटीच्या अधिकाऱ्यांनी गोळीबारात ठार झालेल्यांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये 36 वर्षीय तपतेजदीप सिंह यांचा समावेश आहे. त्याशिवाय या गोळीबारात पॉल डेलाक्रूझ मेगिया, अ‍ॅन्ड्रियन बलेजा, जोस डेजीसस् हर्नांडेझ इल, टिमोथी मायकल रेमो, मायकेल जोसेफ, अब्दुलहाब अलगमंदन आणि लार्स किपलर लेन यांचा समावेश आहे. हल्लेखोर 57 वर्षीय सॅम्युअल कॅसिडीने केला.


सांता क्लारा काउंटी शेरिफ यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या हल्ल्याचा उद्देश्य अद्याप समजला नाही. हल्लेखोर कॅसिडी याला चहुबाजूने घेरण्यात आल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे त्यांनी सांगितले.


हल्लेखोर सॅम्युअल कॅसिडी हा 2012 पासून ‘व्हॅली ट्रान्सपोर्ट ऑथिरिटी’मध्ये (व्हीटीए) काम करत आहे. कॅसिडी हा 2012 ते 2011 दरम्यान मॅकेनिक म्हणून काम करत होता. त्यानंतर सबस्टेशन मेंटेनर म्हणून कार्यरत होता.

Related Stories

फ्रान्समध्ये 1 कोटीहून अधिक लोकांना बूस्टर डोस

Patil_p

93 वर्षीय मेरीला मिळाला नवा जोडीदार

Patil_p

दाऊद इब्राहिमसह 21 दहशतवाद्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक

Patil_p

फ्रान्सकडून भारताला व्हेंटिलेटर, टेस्टिंग किटची मदत

datta jadhav

अमेरिकेच्या आण्विक यंत्रणेवर सायबर हल्ला

datta jadhav

सौदीत तयार होतेय 3 लेयरयुक्त शहर

Patil_p
error: Content is protected !!