तरुण भारत

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; झायडसची डीसीजीआयकडे मागणी

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. कोरोना विरोधातल्या या लढाईमध्ये एक महत्वाचं हत्यार म्हणून पुढं येत असलेल्या मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या चाचणीला परवानगी मिळावी अशी, विनंती झायडसने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) केली आहे.

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीचा वापर अमेरिकेत आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या डोसनंतर कोरोना रुग्णाला रुग्णालयात भरती होण्याची गरज नसते. तसेच या डोसमुळे कोरोना होण्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे.

मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी हे कोरोना विरोधातील प्रमुख हत्यार आहे असं मत अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल आहे. भारतात सिप्ला आणि स्वित्झरलॅन्डची कंपनी रॉश या दोन कंपन्यां एकत्र येऊन मोनोक्लोनल अॅन्टिबॉडीची निर्मिती करत आहेत. कोरोनाचे निदान एखाद्या रुग्णामध्ये झाल्यानंतर त्याला हे मोनोक्लोनल अॅन्टिबॉडी तीन दिवसांच्या आत द्यावे लागते. हे एक प्रकारचे इम्युनिटी बुस्टर आहे. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. तसेच त्याला रुग्णालयात भरती होण्याचीही गरज राहत नाही. भारतात कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत असताना याच्या वापराला परवानगी मिळाली, तर हे मोठे यश असणार आहे.

Advertisements

Related Stories

एन. रंगास्वामी चौथ्यांदा पुदुचेरीचे मुख्यमंत्री

datta jadhav

राज्यात 3,130 जण कोरोनामुक्त

Patil_p

एकनाथ खडसेंना अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव- प्रवीण दरेकर

Abhijeet Shinde

विक्रमी लसीकरणाचा ‘योगा’योग

Patil_p

कल्याण सिंहांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Patil_p

दहशतवादी फंडिंगप्रकरणी जम्मू काश्मीरमध्ये धाडसत्र

Patil_p
error: Content is protected !!