तरुण भारत

नव्या राष्ट्रीय विक्रमासह अचिंताने मिळविले रौप्य

कनिष्ठ वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप

वृत्तसंस्था / ताश्कंत

Advertisements

भारताच्या अचिंता शेउलीने वरिष्ठ स्तरावरील तीन विक्रमांसह सात राष्ट्रीय विक्रम मोडित काढत येथे सुरू असलेल्या कनिष्ठांच्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 73 किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले.

19 वर्षीय अचिंताने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना एकूण 313 किलो वजन उचलले. त्यापैकी स्नॅचमध्ये 141 व क्लीन आणि जर्कमध्ये 172 किलो वजन उचलत वरिष्ठ स्तरावरील तीन व कनिष्ठ स्तरावरील चार नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवले. राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण मिळविणाऱया अचिंताने आपले याआधीची स्नॅच तसेच क्लीन व जर्कमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी दोन किलोनी मागे टाकली. गेल्या महिन्यात येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने एकूण 309 किलो (139+170 किलो) वजन उचलले होते.

इंडोनेशियाच्या ज्युनियनस्याह रिझकीने एकूण 349 किलो (155+194) वजन उचलत सुवर्णपदक मिळविताना तीनही प्रकारात नवे विश्वविक्रम नोंदवले. रशियाच्या सेरोबियन गेव्हार्गने 308 (143+165) किलो वजन उचलत कांस्यपदक मिळविले. अचिंताने पहिल्या प्रयत्नात स्नॅचमध्ये 137 किलो वजन सहजपणे उचलले. पण 141 किलो वजन उचलताना दुसऱया प्रयत्नात अपयशी ठरल्यानंतर तिसऱया प्रयत्नात हे वजन उचलण्यात तो यशस्वी ठरल्याने या प्रकारात त्याला कांस्य मिळाले. खंडीय आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्नॅच, क्लीन-जर्क व एकूण अशा तिन्ही प्रकारांत स्वतंत्रपणे पदके दिली जातात. ऑलिम्पिकमध्ये मात्र एकूण वजन उचलण्यासाठी पदक देण्यात येते. एन.अजितने वरिष्ठ स्तरावर नोंदवलेला 140 किलोचा स्नॅचमधील राष्ट्रीय विक्रम, कनिष्ठ स्तरावरील 139 किलोचा वैयक्तिक विक्रम अचिंताने मागे टाकला. क्लीन व जर्कमध्ये 172 किलो वजन उचलत कनिष्ठ व वरिष्ठ स्तरावरील 170 किलोची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरीही त्याने मागे टाकली. याशिवाय एकूण वजन उचलण्यातही त्याने वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धेतील 310 व 309 किलोचा राष्ट्रीय विक्रमही मोडित काढला. आदल्या दिवशी भारताच्या युवा ऑलिम्पिक चॅम्पियन जेरेमी लालरिननुआंगाने 67 किलो गटात चौथे स्थान मिळवेले होते. यावेळी त्याचे कांस्यपदक केवळ एका किलोने हुकले होते.

Related Stories

ईपीएल स्पर्धेत मँचेस्टर सिटीचे साम्राज्य कायम

Patil_p

पीएसजीला चॅम्पियन्स लीग मिळवून देणे मुख्य लक्ष्य

Patil_p

क्रिकेट : अष्टपैलू इरफान पठाणची निवृत्ती

prashant_c

टी-20 वर्ल्ड कपसाठी पंचांची घोषणा

Amit Kulkarni

ऍस्टन व्हिलाची लिसेस्टरवर मात

Patil_p

ब्रिटनचा इव्हान्स पराभूत

Patil_p
error: Content is protected !!