तरुण भारत

तिबेटच्या नव्या ‘सिक्योंग’ने घेतली शपथ

पेंपा त्सेरिंग यांनी हाती घेतले निर्वासित सरकारचे प्रमुखपद

वृत्तसंस्था / धर्मशाळा

Advertisements

तिबेटच्या निर्वासित संसदेचे माजी अध्यक्ष पेंपा त्सेरिंग यांनी गुरुवारी केंद्रीय तिबेटी प्रशासनाचे नवे अध्यक्ष (सिक्योंग) म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. तिबेटी टीव्हीवर या सोहळय़ाचे थेट प्रसारण करण्यात आले आहे. यात तिबेटींचे आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनीही व्हर्च्युअली भाग घेतला आहे.

पेंपा त्सेरिंग यांनी निवडणुकीत 34 हजार 324 मते मिळविली होती. तर विरोधी उमेदवार केसलंग दोरजे यांना 28 हजार 907 मते मिळाली. नवे अध्यक्ष पेंपा त्सेरिंग यांच्यासह 45 खासदारांचीही निवड करण्यात आली आहे. केंद्रीय तिबेटी प्रशासनाचे नवे अध्यक्ष पेंपा त्सेरिंग यांचे अमेरिकेने अभिनंदन केले आहे. त्सेरिंग यांच्यासोबत काम करत राहू आणि सीटीए ग्लोबल तिबेटी समुदायाला पाठिंबा देणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

पंतप्रधान त्सेरिंग यांचा जन्म कर्नाटकातील ब्यालकुपी येथे 1967 साली झाला होता. बालपणापासूनच त्सेरिंग हे स्वतंत्र तिबेट चळवळीत सामील राहिले आहेत. 2001-2008 दरम्यान नवी दिल्लीत तिबेटीयन पार्लमेंट अँड रिसर्च सेंटरचे ते संचालक होते. तसेच 1996, 2001, 2006 आणि 2011 मध्ये तिबेटच्या निर्वासित संसदेचे सदस्य होते. याचबरोबर अमेरिकेत दलाई लामांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले आहे.

त्सेरिंग यांच्यासमोरील आव्हाने

पेंपा त्सेरिग यांच्यासमोर अध्यक्ष म्हणून अनेक प्रकारची आव्हाने आहेत. सर्वात मोठे आव्हान चीनसोबतची चर्चा पुढे नेण्याचे आहे. तसेच तिबेटचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात प्रखरपणे मांडण्याचे आव्हान आहे. तर भारत सरकारशी चांगले संबंध राखणे त्सेरिंग यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मागील वर्षी अमेरिकेने तिबेटशी संबंधित अधिनियम संमत करून चीनला मोठा धक्का दिला होता.

Related Stories

हॉटस्पॉट यादीत राज्यातील 8 जिल्हे

Rohan_P

खासगीकरणासाठी ४ बँकांची निवड

Patil_p

दोन रस्ते अपघातात गुजरातमध्ये 15 ठार

Omkar B

पंतप्रधान मोदींचा ब्लॉग होतोय लोकप्रिय

Patil_p

मृतांच्या कुटुंबीयांना ‘सप’कडून मदत

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर परताव्याच्या मुदतीत वाढ

tarunbharat
error: Content is protected !!