तरुण भारत

‘पेटीएम’चा 22 हजार कोटींचा आयपीओ लवकरच

या अगोदर कोल इंडियाच्या नावावर सर्वात मोठय़ा आयपीओची नोंद

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

देशातील डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम चालू वर्षामध्ये आयपीओ आणण्याची योजना आखत आहे. कंपनी सदर योजनेमधून जवळपास 21 हजार 900 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे संकेत आहेत. पेटीएमचा आयपीओ लवकर सादर करण्यात आला तर एलआयसी कंपनीच्या अगोदरचा हा देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.

आतापर्यंत देशातील सर्वात मोठा आयपीओ हा कोल इंडियाच्या नावावर राहिला आहे. कोल इंडियाने वर्ष 2010 मध्ये आयपीओ सादरीकरणातून 15,200 कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर कोणत्याही कंपनीने इतका मोठा आयपीओ बाजारात सादर केला नसल्याची माहिती आहे. याच्याही अगोदर रिलायन्स पॉवरने 11 हजार कोटी रुपयांचा आणि मागील वर्षात स्टेट बँक पेमेंट ऍण्ड कार्डने 10 हजार कोटी रुपयांचा आयपीओ सादर केला होता.

पेटीएममध्ये मोठे गुंतवणूकदार

उपलब्ध माहितीनुसार पेटीएम या कंपनीमध्ये बार्कशायर हॅथवे, सॉफ्टबँक ग्रुप आणि अँट ग्रुप हे सर्वात मोठे गुंतवणूकदार राहिले आहेत. बार्कशायर जगातील शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरन बफे यांची कंपनी आहे. चालू नोव्हेंबरपर्यंत पेटीएमला लिस्ट करण्याची योजना आखली जात आहे.

महसूल वाढविण्याचे ध्येय पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा हे मागील काही वर्षांमध्ये कंपनीचा महसूल वाढविण्यावर भर देत आहेत. बँकिंग, क्रेडिट कार्ड, फायनान्शिअल सर्व्हिसेस, वेल्थ मॅनेजमेंट आणि डिजिटल वॉलेटची सेवा देत असून युपीआयवर आधारीतही पेमेंट सेवा देत येत्या काळात महसूल कमाई मजबूत करण्यावर भर देणार असल्याची माहिती यावेळी कंपनीने दिली आहे

Related Stories

पोलादाच्या किमतीत वाढ

Patil_p

स्टोरेज मार्केटमध्ये 4 टक्क्यांची वाढ

Patil_p

भारतामध्ये चिनी कंपनी ‘ओप्पो’चा 5जी प्रवास तेजीकडे

Patil_p

विदेशी बाजारपेठेतही घसरण

tarunbharat

एनटीपीसी-ओएनजीसी यांच्यात करार

Patil_p

इन्फोसिसला 5 हजार कोटींचा नफा

Patil_p
error: Content is protected !!