तरुण भारत

चक्रीवादळांचा मान्सूनवर परिणाम नाही; 31 मे ला मान्सून केरळात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

‘तौक्ते’ आणि ‘यास’ चक्रीवादळांचा मान्सूनवर कोणताही परिणाम झालेला नाही. नियोजित वेळेच्या एक दिवस आधीच 31 मे ला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. मात्र, या दोन्ही चक्रीवादळांमुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.  

Advertisements

नैऋत्य मोसमी वारे मालदीव-कोमोरिनेच्या काही भागातून पुढे गेले आहे. ते आता बंगालच्या नैऋत्य आणि ईशान्यकडील उपसागरात दाखल झाले आहे. गुरुवारी सकाळीच हे वारे आखाती आग्नेय आणि पश्चिम मध्यच्या काही भागात पोहोचले होते. 31 मे ला ते केरळात दाखल होईल.

Related Stories

Pegasus Project : केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी फेटाळले हेरगिरीचे आरोप

Abhijeet Shinde

बहिणीसाठी करणार नाही प्रचार

Amit Kulkarni

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर नवा विक्रम

Patil_p

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका : अजित पवार

Rohan_P

भारतीय माध्यमांवर रशिया नाराज

Abhijeet Shinde

देशमुखांची 4.20 कोटींची मालमत्ता जप्त

Patil_p
error: Content is protected !!