तरुण भारत

सांगली : शिराळा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

प्रतिनिधी / शिराळा

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून, पाच ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. कोरोना बरोबरच पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Advertisements

१ जून पासून चोवीस तास तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. हा कक्ष ३१ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. जीवरक्षक जॅकेट, रिंग, रोप, बॅग्ज, मेगाफोन, बॅटरी हे साहित्य उपलब्ध केले आहे. तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, शोध व सुटका पथक यांची माहिती संकलित करून त्यांना आपत्तीवेळी कोणत्याप्रकारे मदत कार्य करावयाचे याबाबत प्रशिक्षण व माहिती देण्यात आली आहे. गावनिहाय आराखडे करून ब्लु व रेड लाईनमध्ये येणाऱ्या घरांची , नागरिकांची माहिती तयार केली आहे. बुलडोझर, पाण्याचे टँकर, अर्थमुव्हर, जनरेटर आदींचे नियोजन केले आहे.

Related Stories

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचे दिवसात 69 रुग्ण

Abhijeet Shinde

‘आरक्षण अधिकार राज्यांना देण्याचा निर्णय चुकीचा’

Abhijeet Shinde

सांगलीत पूर पट्ट्यातील २८ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत

Abhijeet Shinde

विट्याची ऐतिहासिक पालखी शर्यत यावर्षी रद्द

Abhijeet Shinde

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी

Abhijeet Shinde

माधवनगर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!