तरुण भारत

कर्नाटकात शुक्रवारी ५२ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

बेंगळूर/ प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत चालली आहे. शुक्रवारी राज्यात २२,८२३ कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जास्त आहे. शुक्रवारी ५२,२५३ रुग्ण कोरोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतले. तर ४१० रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात सध्या ३,७२,३७३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २५ लाखाच्यावर गेली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१ लाखाच्यावर गेली आहे. तसेच राज्यत एकूण मृत्यूची संख्या २७,८०६ वर पोचली आहे.

बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना पिझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. शुक्रवारी जिल्हयात ५,७३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर १९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी ५२,२५३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालत्यातून घरी परतले आहेत. कर्नाटकात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५,४६,८२१ वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात सकारात्मकता दर १६.४२ टक्के इतका होता, तर मृत्यू दर १.७५ टक्के होता. तर शुक्रवारी १,३८,९८३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून आतापर्यंत एकूण २,९३,३७,९२८ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Advertisements

Related Stories

पी. जी. आर. सिंधिया काँग्रेसमध्ये दाखल

Amit Kulkarni

केएसआरटीसी नीरज चोप्राला देणार आजीवन ‘गोल्डन पास’

Abhijeet Shinde

कर्नाटकात पहिले लांडग्यांसाठी वन्यजीव अभयारण्य होण्याची शक्यता

Abhijeet Shinde

कर्नाटकात मंगळवारी १ हजार ९१३ नवीन रुग्ण, तर ४८ मृत्यू

Abhijeet Shinde

कर्नाटक : परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांचा पाचव्या दिवशी संप सुरूच

Abhijeet Shinde

म्हैसूरमध्ये प्रथम चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला दिली लस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!