तरुण भारत

अवैधरित्या दारूविक्री करताना एकजण ताब्यात

प्रतिनिधी / नागठाणे : 

काशीळ (ता.सातारा) येथून चारचाकी वाहनातून दारू विक्री करत असताना बोरगाव पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून देशी दारूसह एक मारुती कार असा १ लाख ८१ हजाराचा माल जप्त करण्यात आला.

Advertisements

संशयित केशवराज शिवलाल भंडारी (वय.३३, मूळ.रा.विनई त्रिवेणी, गाव पंचायत नवलपूर, नेपाळ, सध्या रा.काशीळ ता.जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.       

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर, हवालदार विजय साळुंखे, डी. व्ही.जाधव तसेच होमगार्ड लोहार हे काशीळ येथे पेट्रोलिंग करत असताना काशीळ ते पाली जाणाऱ्या राज्यमार्गावर मनाली बारचे मागील बाजूस सुझुकी एक कार उभी असल्याचे दिसून आले. सदर गाडीमधील असलेल्या इसमाच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने सुरुवातीला टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारले असता त्याने गाडीत देशी दारूच्या बाटल्या असल्याचे कबूल केले. विनापरवाना देशी दारू बाळगल्याबद्दल त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार विजय साळुंखे करत आहेत.

Related Stories

सातारा : वाढेचे उपसरपंच भरवणार अनोखी स्पर्धा

Abhijeet Shinde

सत्ताधाऱ्यांकडून फेरीवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

datta jadhav

सातारा : ‘अस्मिता जागर अभियान’ चे रिचार्ज राज्यात पहिल्या क्रंमाकावर

Abhijeet Shinde

पुनवडीतील कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाने घेतले संपूर्ण ग्रामस्थांचे स्वॅब

Patil_p

रब्बी हंगामासाठी नेर कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

Abhijeet Shinde

पिंपरीतील शेतकऱ्यांना बांधावर खते वाटप

datta jadhav
error: Content is protected !!