तरुण भारत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा 1 हजारपेक्षा कमी रुग्ण; अरविंद केजरीवाल म्हणाले …

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


दिल्लीत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच 1 हजार पेक्षा कमी म्हणजेच जवळपास 900 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, त्याचबरोबर दिल्लीत मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. त्यामुळे दिल्लीचे अनलॉकच्या दिशेने पाऊल पडत असल्याचे सकारात्मक चित्र आहे, अशी. माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.  

Advertisements


दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ‘ड्राइव्ह थ्रू व्हॅक्सिनेशन’चे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही उपस्थित होते.


पुढे ते म्हणाले, सध्या राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन आहे. जस जशी रुग्ण संख्या कमी होत जाईल, त्यावेळी आम्ही अनलॉक करू. यापूर्वी 30 मार्च रोजी 992 रुग्ण आढळून आले होते. या लॉकडाऊनच्या काळात दिल्लीतील नागरिकांनी केलेले सहकार्य आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने रुग्ण संख्या कमी होण्यास मदत मिळाली आहे. असे असले तरी अजून हे युद्ध संपलेले नाही. त्यामुळे यापुढेही आपल्याला काळजी घेतली पाहिजे. 


दरम्यान, दिल्लीत रुग्णसंख्या कमी झाली असली तरी लसीकरण मोहिम मंदावली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परदेशातून व्हॅक्सिन खरेदीची योजना आखली आहे. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाने 10 दशलक्ष डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. या टेंडरसाठी प्रस्ताव भरण्याची 7 जून ही शेवटची तारीख आहे.

Related Stories

राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार हवा!

Amit Kulkarni

देशात 96,551 नवे कोरोना रुग्ण, एकूण रूग्णसंख्या 45.62 लाखांवर

datta jadhav

व्यावसायिक सिलिंडर 17 रुपयांनी महागला

Patil_p

एससीओ परिषदेत मोदी, जिनपिंग सामील होणार

Patil_p

सोलापुरात दिवसभरात 50 रुग्ण, तिघांचा बळी

triratna

मॉस्कोतील बैठकीपूर्वी पँगाँगमध्ये भारत-चीन सैन्यांकडून गोळीबार

datta jadhav
error: Content is protected !!