तरुण भारत

धामणे परिसरात भात पेरणीला प्रारंभ

वार्ताहर/ धामणे

धामणे व परिसरातील कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, अवचारहट्टी येथील शेतकरी भात पेरणी कामाला जोमात लागलेले असून काही शेतकरी ट्रक्टरच्या साहाय्याने तर काही शेतकरी बैलांच्या आणि काही शेतकरी माणसांनी कुरी ओढून भात पेरणी करत आहेत.

Advertisements

यंदा वळीव पाऊन अधूनमधून जास्त प्रमाणात झाल्याने येथील शेतकऱयांची शेतातील पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबून राहिली होती. परंतु आता गेल्या चार दिवसापासून कामाना जोरात सुरुवात झाली असून मशागतीची कामे पूर्ण झालेले शेतकरी भात पेरणी करत आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे कामगार वर्ग शेतातील कामे करत आहेत. त्यामुळे कायम शेतात काम करणाऱया शेतकऱयांना कोरोनामुळे या कामगारांचा शेतातील कामाला चांगलाच हातभार लागला
आहे.

पेरणीचा कालावधी थोडा राहिल्याने शेतकऱयांची पेरणीसाठी जोरात धडपड दिसत आहे. कारण रोहिणी नक्षत्राला भात पेरणीला शेतकरी सुरुवात करतात. परंतु यंदा पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने शिवारातील मशागतीची कामे खोळंबून राहिली असल्याने आता पावसाने उघडीप दिल्याने शेतातील मशागतीच्या कामास गती आली आहे. कारण मृगनक्षत्र येत्या 8 जूनला सुरुवात होणार असून पावसाळय़ाला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱयांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवर चोख पोलीस बंदोबस्त

Patil_p

पावसाने वाहून गेलेला रस्ता बरा, पण…

Amit Kulkarni

कुस्तीगीर संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

Amit Kulkarni

कोरोना वॉरियर्स म्हणून नोकरीत सामावून घ्या

Amit Kulkarni

शहापुरी रेशमीचा थाट कायम!

Patil_p

खानापूर तालुक्मयात दहावीचा पहिला पेपर सुरळीत

Patil_p
error: Content is protected !!