तरुण भारत

जगातील सर्वात महागडी कार

200 कोटी रुपये आहे किंमत

आलिशान कार तयार करणारी प्रसिद्ध कंपनी रोल्स रॉयसने जगातील सर्वात महागडी कार सादर केली आहे. या कारचे नाव बोट टेल असून याची किंमत 20 दशलक्ष पाउंड्स म्हणजेच सुमारे 200 कोटी रुपये आहे. चार वर्षांच्या मेहनतीनंतर कंपनीने ही कार तयार केली आहे.

Advertisements

रोल्स रॉयल्स बोट टेल चार आसनांची आलिशान कार असून ती 19 फूट लांब आहे. नव्या कोचबिल्ड प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात आलेली ही पहिली रोल्स रॉयस कार आहे. ही कार रोल्स रॉयल्सच्या स्वेप टेल कारने प्रेरित आहे. बोट टेल पूर्वीपर्यंत स्वेप टेलच रोल्स रॉयल्सची सर्वात महागडी कार होती.

स्वेप टेलला रोल्स रॉयसने 2017 मध्ये सुमारे 130 कोटी रुपयांमध्ये विकले होते. या कारचे केवळ एकच मॉडेर सादर झाले होते. एका प्रतिष्ठित युरोपियन व्यक्तीच्या मागणीनंतर ही आलिशान कार तयार करण्यात आली होती. बोट टेल  कारचे तीन मॉडेल्स सादर केले जाणार आहेत.

या कारचा मागील हिस्सा एका लक्झरी स्पीडबोटीशी मिळताजुळता आहे. या कारला कुठल्याही उत्तम हॉलिडेसाठी किंवा पिकनिकच्या दृष्टीकोनातून सर्वप्रकारच्या सुविधांसह तयार करण्यात आहे. याहून अधिक चांगले पॅकेज अन्य कुठल्याच कारमध्ये मिळणार नसल्याचे रोल्स रॉयसचे सीईओ टॉर्सटन मुलर यांनी म्हटले आहे.

याचबरोबर या कारमध्ये एक 15-स्पीकरचा सराउंड सिस्टीम आहे. कारचा प्लॅटफॉर्म एका साउंड बॉक्सप्रमाणे वापरता येईल अशाप्रकारे ही सिस्टीम मॉडिफाय करण्यात आली आहे. या कारसाठी स्वीत्झर्लंडमधील प्रख्यात बोवी 1822 या  घडय़ाळय़ांच्या कंपनीने एक विशेष घडय़ाळ तयार केले आहे.

रोल्स रॉयसच्या कलिनन, फँटम आणि ब्लॅक बॅज यासारख्या आलिशान कारमध्ये वापरण्यात आलेल्या इंजिनचा या कारमध्ये समावेश करण्यात आला आहे. व्ही126.75 बाईटर्बो इंजिन 563 एचपीची शक्ती देण्यास सक्षम आहे.

भारतात या कंपनीचे कार अनेक धनाढय़ वापरत आहेत. दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना रोल्स रॉयस फँटम कार भेट म्हणून दिली होती. याचबरोबर भारतीय चित्रपट कलाकारांकडेही ही आलिशान कार आहे. यात ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार, संजय दत्त आणि बादशाह इत्यादींचा समावेश आहे.

Related Stories

मुशर्रफना फाशी सुनावणाऱ्या न्यायाधीशाचा कोरोनाने मृत्यू

Omkar B

चीनच्या पोटदुखीचे कारण झाले उघड

Patil_p

‘लॅम्बडा’ व्हेरिएंटची 30 देशात हजेरी

datta jadhav

बायडेन घेणार लस

Patil_p

101 वर्षांची ‘लॉबस्टर लेडी’

Patil_p

सर्वात क्रूर महिला 17 वर्षांनी निघाली निर्दोष

Patil_p
error: Content is protected !!