तरुण भारत

आमदार पी. राजीव, ऐहोळे यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

चिकोडी, गोकाक येथे आरटीपीसीआर सेंटर सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी – व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कुडची व रायबाग मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. तसेच बेळगाव येथून अहवाल येण्यास वेळ लागत असल्याने संसर्ग मोठय़ा प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे तातडीने अहवाल येण्यासाठी चिकोडी व गोकाक येथे आरटीपीसीआर सेंटर सुरू करावे, अशी मागणी कुडचीचे आमदार पी. राजीव व रायबागचे आमदार डी. एम. ऐहोळे यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याकडे केली. शनिवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा राज्यातील आमदारांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद कार्यक्रम झाला. यावेळी ही मागणी करण्यात आली.

 आमदार पी. राजीव म्हणाले, कुडची विधानसभा मतदारसंघात रुग्णसंख्या वाढली असून मतदारसंघाचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे कुडची येथे ऑक्सिजन प्लांटची गरज आहे. सरकारी रुग्णालयांना औषधांचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होत आहे. ब्लॅक फंगस संसर्गही वाढत असून त्यावरील औषधे तातडीने देण्यात यावीत. कार्यक्षेत्रात रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साखळी तोडण्यासाठी तातडीने चाचणीचा अहवाल येणे आवश्यक आहे. मात्र, बेळगावहून अहवाल येण्यास पाच-सहा दिवस लागत आहेत. त्यामुळे प्रथम व द्वितीय संपर्कातील व्यक्तींकडून कोरोनाचा प्रसार होत आहेत. यामुळे कार्यक्षेत्रात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चिकोडी व गोकाक येथे केंद्राची स्थापना करण्यात यावी. रायबाग येथे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचा पुरवठा प्राधान्याने करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

चोरी प्रकरणाचा चार दिवसात छडा

Amit Kulkarni

आझाद गल्लीचे निर्बंध हटणार

Patil_p

मनपाचे कोटय़वधीचे नुकसान

Patil_p

शहरातील पाणीपुरवठय़ात उद्या व्यत्यय

Patil_p

हारुगेरी नगराध्यक्षपदी निर्मला कुरी

Patil_p

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यास परवानगी

Patil_p
error: Content is protected !!