तरुण भारत

लॉकडाऊन पुन्हा वाढणार?

5 जून रोजी मुख्यमंत्री घेणार निर्णय

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

कोरोना नियंत्रणासाठी कठोर निर्बंध आणि कंटेन्मेंट नियमावली 30 जूनपर्यंत जारी ठेवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकात 7 जून नंतरही लॉकडाऊन वाढविण्याबाबत शासकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. 5 जून रोजी होणाऱया मंत्री आणि अधिकाऱयांच्या बैठकीत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा लॉकडाऊन वाढीबाबत ठोस निर्णय घेणार आहेत.

राज्यात लॉकडाऊन जारी झाल्यानंतर कोरोना संसर्ग नियंत्रणात येत आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी आणखी परिणामकारी उपाययोजना हाती घेण्यासह 7 जूननंतरही लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा कल आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, महसूलमंत्री आर. अशोक व इतर मंत्र्यांचा आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे समजते. 7 जूनपर्यंत वेळ आहे. त्यामुळे आताच लॉकडाऊनवाढीची घोषणा नको. परिस्थिती बघून निर्णय घेतला येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे 7 जूननंतर किमान 7 दिवस लॉकडाऊन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असला तरी पॉझिटिव्हीटी रेट 17 टक्के आहे. हा रेट 5 टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. तो रेट 10 टक्क्यांवर येईपर्यंत राज्यात लॉकडाऊन जारी ठेवण्याचा सल्ला सरकारला तज्ञांनी दिला आहे. लॉकडाऊन अचानक हटविल्यास संसर्ग पुन्हा वेगाने वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया हाती घेणे योग्य असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाचा आदेश, मंत्र्यांची मते, तज्ञांचा सल्ला या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री येडियुराप्पा योग्य निर्णय घेणार आहेत. लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी 5 जून रोजी येडियुराप्पा यांनी मंत्री आणि अधिकाऱयांची बैठक बोलावली असून या बैठकीतच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

लॉकडाऊन वाढविण्याबाबत अनेक मंत्र्यांची भूमिका सकारात्मक असून येडियुराप्पा यांनी लॉकडाऊनची मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर मंत्री अधिकाऱयांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. लॉकडाऊन वाढविला तरी नियम कोणत्या स्वरूपाचे असावेत?, यापूर्वीचेच नियम जारी ठेवावेत की शिथिलता आणावी, याविषयी तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच येडियुराप्पा स्पष्ट निर्णय घेतील.

सध्याच्या लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल नाही

गृहमंत्री7 जूनपर्यंत लॉकडाऊन जारी राहणार आहे. यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असे स्पष्टीकरण गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहे. बेंगळूरमध्ये शनिवारी पत्रकारांशी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्रालयांने राज्यांना योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार राज्यात 30 जूनपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले

Related Stories

कर्नाटक: आम्हाला जेडी-एसच्या समर्थनाची गरज नाही: मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

कर्नाटक : राज्यात मंगळवारी ८१५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

Abhijeet Shinde

कर्नाटकात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २०० नवीन रुग्ण

Abhijeet Shinde

ड्रॅग रॅकेट: अभिनेत्री संजनाला भेटलो नाही: आमदार जमीर अहमद

Abhijeet Shinde

बेकायदेशीरपणे रेमडेसिवीरची विक्री; तिघांना अटक

Amit Kulkarni

कर्नाटकमध्ये १,६४८ रुग्ण कोरोनामुक्त, तर २४ तासात १८ मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!