तरुण भारत

गुळण्या करून समजणार कोरोनाचा संसर्ग

आयसीएमआरकडून चाचणीच्या नव्या पद्धतीला मंजुरी – 3 तासांत मिळणार अहवाल

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांदरम्यान कोरोना चाचणीची एक नवी ‘सलाइन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धत सादर करण्यात आली आहे. या प्रकारच्या चाचणीतून केवळ 3 तासांत कोरोना संक्रमणाचा निष्कर्ष प्राप्त होणार आहे. या चाचणी पद्धतीला आयसीएमआरकडून मंजुरी मिळाली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अंतर्गत नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण इंजिनियरिंग संशोधन संस्थेच्या (एनईईआरआय) वैज्ञानिकांनी ही पद्धत विकसित केली आहे.

आयसीएमआरने नीरीला स्वतःच्या पथकांना देशभरात लॅबमध्ये नव्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठविण्याकरता स्वतःची मंजुरी दिली आहे. पद्धतीनुसार संबंधिताला खाऱया पाण्याच्या गुळण्या केल्यावर एका सामान्य कलेक्शन टय़ूबमध्ये थुंकण्याची आवश्यकता असते. कलेक्शन टय़ुबमधील हे नमुनाद्रव्य एका लॅबमध्ये नेण्यात येते, तेथे खोलीच्या तापमानावर नीरीकडून तयार एका विशेष बफर सोल्युशनमध्ये ठेवले जाते. जेव्हा हे सोल्युशन गरम करण्यात येते, तेव्हा एक आरएनए टेम्पलेट तयार होते. सोल्युशनला पुढे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पोलीमरेज चेन रिऍक्शनसाठी (आरटी-पीसीआर) प्रक्रियाकृत केले जाते.

नमुने मिळविणे सोपे

या नव्या पद्धतीने नमुने गोळा करणे आणि प्रक्रियाकृत करणे अत्यंत स्वस्त ठरते. लोक स्वतःच कोरोना संक्रमणाची चाचणी करू शकतात, कारण ही पद्धत सेल्फ सॅम्पलिंगची अनुमती देते. याकरता कलेक्शन सेंटरवर रांगेत उभे राहणे किंवा गर्दी करण्याची गरज भासत नाही. या प्रकारत वेळेची मोठी बचत होते. तसेच संक्रमणाचा खतरा कमी होतो. या पद्धतीत कचराही कमीत कमी तयार होतो असे नीरीच्या पर्यावरण वायरोलॉजी विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी सांगितले आहे.

नवी पद्धत सोपी अन् रुग्णस्नेही

दुसरीकडे नाक आणि गळय़ातून स्वॅब घेण्यास अधिक वेळ लागतो. याचबरोबर नमुना घेण्याच्या या पद्धतीमुळे रुग्णाला त्रास होतो. कित्येकदा तर नमुना एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेताना नष्ट होतो. तर स्लाइन गार्गल आरटी-पीसीआर त्वरित होते. ही पद्धत सोपी आणि रुग्णस्नेही देखील आहे. ही पद्धत वैद्यकीय सुविधा नसलेल्या ग्रामीण भागांसाठी अधिक लाभदायक असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

Related Stories

लालू प्रसाद यादव यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Rohan_P

मध्यप्रदेशात अपघातात कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

Patil_p

उत्तराखंडात 500 नवे कोरोना रुग्ण; 2,236 रुग्णांवर उपचार सुरू

Rohan_P

दिल्लीत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Patil_p

अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णवेळ होणार

tarunbharat

दिलासादायक! दिल्लीत एका महिन्यात 32 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

Rohan_P
error: Content is protected !!