तरुण भारत

कॅरोलिना मरिनचा ऑलिम्पिक सहभाग अनिश्चित

वृत्तसंस्था /  बार्सिलोना

23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनची विद्यमान  ऑलिम्पिक सुवर्णजेती कॅरोलिना मरिन हिच्या सहभागाविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. मरिनला सरावावेळी गुडघ्याला दुखापत झाल्याने ती या स्पर्धेत खेळेल का, याबाबत साशंकता आहे.

Advertisements

2016 रिओ ऑलिंपिक स्पर्धेत मरीनने सुवर्णपदक पटकाविले होते. शुक्रवारी  सरावावेळी उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला सरावातून माघार घ्यावी लागली. डॉक्टरांनी काही चाचण्या घेतल्या असून त्यानुसार गुडघ्याच्या वाटीमधील स्नायू दुखावल्याने तिच्या गुडघ्याला सूज आली आहे. 2019  जानेवारीमध्ये देखील मरिनला उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. 2020-21  बॅडमिंटन हंगामात तिने पाच स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शवत त्यापैकी चार स्पर्धा जिंकल्या आहेत.

Related Stories

बेलग्रेड स्पर्धेत जोकोविच अजिंक्य

Patil_p

माजी फुटबॉलपटू, प्रशिक्षक हकिम यांचे निधन

Patil_p

सिडनी एफसी ला फुटबॉलचे जेतेपद

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सची अंतिम फेरीत धडक

Patil_p

व्हेरेव्ह, बुस्टा, ब्रॅडी, ओसाका उपांत्य फेरीत

Patil_p

वनडे क्रिकेटबाबत चिंतेचे कारण नाही

Patil_p
error: Content is protected !!