तरुण भारत

आयओसीच्या कोरोना लसीकरण ऑफरची दक्षिण आफ्रिकेकडून समस्यांचे सूर

वृत्तसंस्था/ केपटाऊन

आगामी टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱया ऍथलीट्ससाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने कोरोना लसीकरणाची ऑफर दिली असली तरी या लसींचा साठा संपत आल्याने दक्षिण आफ्रिकेच्या ऍथलीटस्समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Advertisements

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना कोरोना संदर्भातील लसीकरण करून घेण्याकरिता आता मोठय़ा समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जॉन्सन कंपनीच्या कोरोना लसीचा एक डोस यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना देण्यात आला आहे. आता आयोसीकडून फायजर कंपनीच्या कोरोनाचे दोन डोस देण्याची ऑफर करण्यात आली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला आता जास्त कालावधी राहिला नसल्याने खेळाडूंची लसीकरण करवून घेण्यासाठी थांदल उडत असल्याचे दक्षिण आफ्रिका ऑलिंपिक संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसाठी फायजर कंपनीच्या कोरोना लसीच्या उपलब्धेसाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लसीमध्ये 28 दिवसांचे अंतर राखणे जरूरीचे आहे पण आता हा कालावधी तीन महिन्यांचा असावा असे दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागातील तज्ञानी सूचित केले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ऑलिंपिक पथकासाठी आयओसीने फायजर कंपनीचे 600 लस  देण्याचे ठरविले आहे पण अद्याप या लसी दक्षिण आफ्रिकेला मिळालेल्या नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला कोरोना समस्येने चांगलाच दणका दिला आहे. संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत 1.6 दशलक्ष लोकांना कोरोनाची बाधा झाली असून किमान 56 हजार लोकांचे बळी पडले आहेत. संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकूण लोकसंख्येच्या केवळ एक टक्का लोकांचे लसीकरण झाले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Stories

रियल माद्रिदचे खेळाडू वेतन कपातीस राजी

Omkar B

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेवरही टांगती तलवार कायम

Patil_p

बर्लीन स्पर्धेतून ओसाकाची माघार

Patil_p

न्यूझीलंड युवा संघ उपांत्य फेरीत

Patil_p

राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीत सेहवाग, सरदार सिंग

Patil_p

झेकच्या क्विटोव्हाची स्पर्धेतून माघार

Patil_p
error: Content is protected !!