तरुण भारत

“मुख्यमंत्री ‘या’ तारखेला लॉकडाऊन वाढीसंदर्भात घेतील निर्णय”

बेंगळूर/प्रतिनिधी

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी सांगितले की कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा ४ किंवा ५ जून रोजी राज्यात लॉकडाऊन वाढविण्याबाबत अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना विविध बाबी विचारात घ्याव्या लागल्यामुळे आता लॉकडाऊनच्या विस्ताराचा अंदाज बांधणे अकाली होईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

“येडीयुरप्पा यांनी दुसर्‍या लाटेदरम्यान कोविडच्या व्यवस्थापनात सर्व योग्य ती पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे, त्यांच्या कॅबिनेट मंत्री आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर लॉकडाऊन वाढीसंदर्भात ७ जूनपूर्वी निर्णय घेण्यात येईल, त्यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि सद्य परिस्थिती यावर आधारित निर्णय असेल ” असे ते म्हणाले.

जोशी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार कोविडशी युद्धपातळीवर लढा देत आहे. दहा दिवसांतच केंद्राने आपली वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन क्षमता ९०० टनांवरून ९ हजार टनांपर्यंत वाढविण्यास सक्षम केले. तसेच काही दिवसांपूर्वी पुरवठा कमी पडलेला रिमडेसिवीरचा पुरवठा वाढल्याने आता बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे आणि आता पुरवठ्यामध्ये कमतरता नाही. तसेच, ब्लॅक फांगसच्या विरूद्ध औषधे येत्या दोन ते तीन दिवसांत मुबलक प्रमाणात दिली जातील, असे ते म्हणाले.

नेतृत्व बदल नाही
केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी म्हणाले की कर्नाटकात नेतृत्व बदलणार नाही. येडियुरप्पा वयस्कर असले तरी ते कार्यक्षमतेने काम करीत आहेत. आणि त्यांचे वय जास्त असल्याने नेतृत्व बदलण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

कर्नाटक : विधानपरिषद निवडणुकीसाठी एक लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Abhijeet Shinde

राज्यातील सर्व जिल्हय़ांमध्ये ऑक्सिजन बससेवेचा विस्तार करणार

Amit Kulkarni

दंत आरोग्याबाबत जनजागृती करण्याची गरज : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

राज्य सरकारकडून लवकरच कोविड पॅकेज मिळणार

Amit Kulkarni

बेंगळुरातील कोरोना रुग्णसंख्येत चार पटीने वाढ

Amit Kulkarni

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज सूचना मिळणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!