तरुण भारत

”देशाला मृत्यूच्या खाईत लोटनाऱ्या मोदींनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा”

मुंबई / ऑनलाईन टीम

केंद्रीय स्तरावर भाजप पक्षाला सत्तेत येऊन सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ मुंबई येथे काँग्रेसकडून निषेध सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांनी १३० कोटी जनतेला मृत्यूच्या खाईत लोटनाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

गेल्या सात वर्षात खोटी आश्वासने देत चूकीची माहिती देत संपुर्ण देशाला फसवले आहे. तरुणांना रोजगार देणार आहे, असे म्हणत संपूर्ण युवकांना बेरोजगार केले आहे. तसेच मुटभर उद्योगपतींसाठी फसवे शेतकरी कायदे लागू करत शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजपने केले. गेले सहा महीने देशाचा शेतकरी आंदोलन करीत असताना देशाचे पंतप्रधान या राज्यातून त्या राज्यात निवडणूक सभा घेत महिलांची अवहेलना करीत आहेत. मात्र या पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांशी बोलावे त्यांच्याशी साधी चर्चा करावी असं एकदा ही वाटलं नाही.

21 डीसेंबर 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना महामारी चीनमधून आपल्या देशात ही धुमाकूळ घालू शकते. त्यामूळे आपल्या देशाच्या सीमा बंद करण्याच्या सूचना केंद्र शासनाला केल्या होत्या मात्र यावेळी देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या लढाईच्या तयारीत होते. मोदी सरकार हे सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. महागाई प्रचंड वाढल्याने लोकांना जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अर्थव्यवस्था रसातळाला गेली असल्याचे नाना पटोले म्हणाले.

७० वर्षात देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी अपार मेहनत घेऊन देश उभा केला. पण मोदींनी आपल्या मुठभर उद्योगपती मित्रांसाठी रेल्वे, विमानतळ, बंदरे, बीएसएनएल, एलआयसी, पेट्रोलियम कंपन्या, बँका हे सर्व विकायला काढली. देश अधोगतीकडे घेऊन जाणाऱ्या मोदी सरकारचा काँग्रेसने आज काळा दिवस पाळून निषेध केला, अशा प्रकारे मोदींनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा अशी काँग्रेसकडून यावेळी करण्यात आली.

Advertisements

Related Stories

शाहूवाडी पंचायत समिती कर्मचाऱ्याला कोरोना

Abhijeet Shinde

राज्यसेवा मुख्य परीक्षेत कोल्हापूर `सब से तेज’

Abhijeet Shinde

”सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाला एक वर्ष उलटल्यानंतरही सीबीआय गप्प का?”

Abhijeet Shinde

पाठय़पुस्तकाचे मंगळवारपासून होणार वितरण

Patil_p

मनपरिवर्तन नव्हे ही तर पराभवाची भीती

Amit Kulkarni

सोलापूर : लालपरी सुरू पण प्रवाशांच्या विना

Abhijeet Shinde
error: Content is protected !!