तरुण भारत

आशियाई लोकांबद्दल बायडेन यांचा महत्त्वाचा निर्णय

अमेरिकेतील प्रत्येक विभागात 15 टक्के नियुक्ती होणार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

अमेरिकेत भेदभावाला सामोरे जाणाऱया आशियाई वंशाच्या लोकांच्या कल्याणासाठी अध्यक्ष जो बायडेन कार्यकारी आदेशाद्वारे आयोग स्थापन करणार आहेत. सार्वजनिक, खासगी आणि स्वयंसेवी क्षेत्र मिळून कशाप्रकारे आशियाई समुदायाच्या भल्यासाठी काम करता येईल याविषयी सल्ला हा आयोग अध्यक्षांना देणार आहे.  याचबरोबर अध्यक्षांनी सर्व विभागांमध्ये किमान 15 टक्के आशियाई अमेरिकनांना स्थान देण्याचा निर्देश दिला आहे. या समुदायासाठी काम करणाऱया एका वरिष्ठ संपर्क अधिकाऱयाची व्हाइट हाउसमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.

मागील काही महिन्यांमध्ये अमेरिकेत आशियाई लोकांच्या विरोधात हिंसा आणि भेदभावाच्या घटना वाढल्या आहेत. मागील वर्षी अशा 6,600 हून अधिक घटना घडल्या आहेत. याचमुळे प्रशासनाने आशियाई-अमेरिकन समुदायच्या विरोधातील पूर्वग्रह आणि द्वेष रोखण्यासाठी संशोधनास अर्थबळ पुरविणार आहे.  संघीय कार्यक्रम आणि योजना या समुदायापर्यंत पोहोचविण्यासाठी भाषेच्या जाणकारांची भरती केली जाणार आहे. अमरिकेत नॅशनल सायन्स फौंडेशन अशा 100 हून अधिक कार्यक्रमांना निधी पुरविणार आहे.

अमेरिकेत सुमारे 2.25 कोटी (6 टक्के) लोक आशियाई वंशाचे आहेत. यात सुमारे 52 लाख चिनी आणि 42 लाख भारतीय आहेत. मागील एक दशकात अमेरिकेत वांशिक समुहांदरम्यान सर्वाधिक लोकसंख्या वृद्धीदर आशियाई लोकांचा राहिला आहे. 2000-2019 दरम्यान आशियाई लोकसंख्येत 81 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.

Related Stories

रशियात 7 हजारांहून अधिक नवे रुग्ण

Patil_p

लस चाचणीतील चूक ठरली वरदान

Patil_p

मॉरिशसमध्ये भारतीय कॅप्टन अटकेत

Patil_p

सर गंगाराम यांचे समाधीस्थळ 10 वर्षांनंतर सर्वसामान्यांसाठी खुले

Patil_p

ब्रिटनमध्ये दुसरी लाट

Patil_p

‘कोरोना’ पोहोचला आता ब्रिटिश न्यायालयात

Patil_p
error: Content is protected !!