तरुण भारत

मिल्खा सिंग यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

वृत्तसंस्था/ चंदीगड

भारताचे माजी ऑलिंपिक धावपटू तसेच ‘फ्लाईग शिख’ 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना रविवारी मोहालीतील फोर्टीस रूग्णालयातून डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली. मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांना ऑक्सिजन ठेवण्यात आले आहे.

Advertisements

रूग्णालयातील डॉक्टरांना मिल्खा सिंग यांच्या कुंटुबीय सदस्यांनी घरी घेवून जाण्याची विनंती केली. या विनंतीनुसार डॉक्टरांनी मिल्खा सिंग यांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला. मिल्खा सिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मिल्खा सिंग यांची पत्नी 82 वर्षीय निर्मला कौर यांनाही यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे मोहालीच्या रूग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय इलाज सुरू असून शनिवारी त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

माजी हॉकी प्रशिक्षक परमेश्वन यांचा ‘द्रोणाचार्य’साठी अर्ज

Patil_p

ईसीबीकडून द हंड्रेड क्रिकेटपटूंबरोबरचा करार रद्द

Patil_p

आशिया चषक स्पर्धा रद्द

Patil_p

कॅनडा एटीपी चषकाचा मानकरी

Patil_p

ऋतुजा-इमेली दुहेरीतील विजेते

Patil_p

भारताला मिश्र, पुरुष सांघिक गटात सुवर्ण

Patil_p
error: Content is protected !!