तरुण भारत

16 वर्षाच्या मुलाची गळफास घेवून आत्महत्या

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

येथुन दहा किमी अंतरावर असलेल्या मांघर गावातील दहावीत शिकत असलेल्या अंकित विजय शिंदे या 16 वर्षाच्या मुलाने पाण्याची टाकी शिवारातील एका उंबराच्या झाडाला शनिवारी गळफास घेवुन आत्महत्या केली महाबळेश्वर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असुन पोलिस पुढील तपास करीत आहे 

Advertisements

   विजय गणपत शिंदे वय 48 हे आपल्या कुटूंबा सोबत मांघर येथे राहातात त्यांना एक मुलगी व दोन मुले आहेत विजय शिंदे हे मोलमजुरी करून आपले कुटूंब चालवितात शनिवारी नेहमी प्रमाणे विजय शिंदे हे मोलमजुरीसाठी तळदेव येथे गेले तर त्यांचा एक मुलगा आकाश हा रानात जळण आणण्यासाठी गेला त्या मुळे शनिवारी विजय शिंदे यांची पत्नी व त्यांची मोठी मुलगी व दहावित शिकत असलेला अंकित हे तिघेच घरी होते दुपारी जेव्हा आकाश रानातुन घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की सकाळी तु गेल्या नंतर अंकित आपला मोबाईल घरी ठेवुन न जेवताच घरातुन निघुन गेला आहे बराच वेळ झाला तरी तो आला नाही आईने सांगितल्या मुळे आकाशने आपला लहान भाउ अंकितचा शोध सुरू केला साडेचार वाजता पाण्याची टाकी या शिवारात आकाशला एका उंबराच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेतलेल्या अवस्थेत अंकित आढळुन आला हे पाहुन आकाश हादरला त्यांने घरी धावत जावुन याबाबतची माहीती आईला दिली त्या नंतर त्यांन गळफास घेतलेली दोरी कापण्यासाठी सुरी सोबत घेतली व शेजारी असलेला मित्र राजेंद्र पवार यास सोबत घेवुन आकाश पुन्हा पाण्याची टाकी या शिवारात आला त्यांने सुरीने गळफास घेतलेली दोरी कापुन अंकितला खाली घेतले व या घटनेची माहीती त्यांनी पोलिसांना दिली त्याच प्रमाणे अंकितला त्यांनी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले तेथे कर्तव्यावर असलेले वैदयकिय अधिकारी यांनी उपचारा पुर्वीच अंकित मृत्यु पावला असल्याचे सांगितले अंकितच्या अकाली जाण्याने मांघर येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे 

    अंकितचा भाव आकाश याने या बाबत महाबळेश्वर पोलिसांना खबरी जबाब दिला या जबाबा वरून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास महाबळेश्वर पोलिस करीत आहेत.

Related Stories

मेट्रोमॅननंतर भारताची धावराणी पी.टी.उषा भाजपच्या वाटेवर

Patil_p

लस निर्मितीनंतर दिसणार चढाओढ

Patil_p

2 दहशतवाद्यांसह पाकिस्तानी सैनिकाचा खात्मा

Patil_p

सलग पाचव्या दिवशी नव्या बाधितांमध्ये घट

Patil_p

उत्तर प्रदेशातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा

Rohan_P

69 हजार शिक्षक भरती प्रकरणाचा खुलासा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली

Rohan_P
error: Content is protected !!