तरुण भारत

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीधारकांना सुरक्षा कवच

सहकारमंत्र्यांच्याहस्ते योजनेचा शुभारंभ : रु.1 लाखांपर्यंतच्याठेवीराहणारसुरक्षित

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या ठेवीधारकांना दिलासा देणाऱया ‘ठेवी सुरक्षा योजने’चा शुभारंभ सहकारमंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते घटक राज्यदिनाचे औचित्य साधून  करण्यात आला. फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये रविवारी सकाळी पत्रकार व काही मोजक्याच सरकारी कर्मचाऱयांच्या उपस्थित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यातील एखादी पतसंस्था बुडीतखात्यात गेल्यास किंवा पतसंस्थेचे एकत्रीकरण झाल्यास ठेवीधारकांना व्याजासह रु. 1 लाखापर्यंचे सुरक्षा कवच लाभणार आहे.

कार्यक्रमाला सहकार निबंधक अरविंद खुटकर, कला मंदिरचे उपाध्यक्ष तथा फोंडय़ाचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर व सदस्य सचिव स्वाती दळवी या उपस्थित होत्या.

गोवा राज्य सहकार कायदा 2001 मध्ये दुरुस्ती करुन कलम 20 ‘ब’ नुसार ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यातील सहकारी पतसंस्था, पगारदार कर्मचारी पतसंस्था, अर्बन पतसंस्था व बहुउद्देशीय पतसंस्थांमधील ठेवीधारकांना या योजनाचा लाभ मिळणार आहे. पतसंस्थांमधील सर्वसामान्य ठेवीधारकांच्या गुंतवणूकीला सुरक्षेची हमी प्राप्त व्हावी या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आल्याची माहिती मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी बोलताना दिली. गोवा राज्यात नोंदणीकृत असलेल्या 269 पगारदार कर्मचारी  पतसंस्था, 228 अर्बन पतसंस्था व 62 बहुउद्देशीय पतसंस्थामधील ठेविधारकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

एकलव्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ

अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी कल्याण खात्यातर्फे ‘एकलव्य प्रशिक्षण योजना’ या अन्य एका योजनेचाही मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला. दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजनेचा लागू होणार आहे. खासगी शिकवणीसाठी पात्र विद्यार्थ्यांना शिकवणीच्या शुल्कात 75 टक्के सवलत मिळणार असून उर्वरीत 25 टक्के रक्कम विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांना भरावी लागेल. राज्यातील शासकीय नोंदणीकृत खासगी शिकवणी संस्था ज्या शिक्षण खात्याशी संलग्नीत आहेत अशा संस्थांमधून शिकवणी घेणाऱया विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. दहावीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित व इंग्रजी विषयांसाठी तर अकरावी व बारावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, गणित, जीवशास्त्र, भूगोल, प्राणीशास्त्र, अर्थशास्त्र, इंग्रजी, अकाऊंटस् व जुओलॉजी या विषयांत खासगी शिकवणी घेण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. योजनेच्या लाभधारकांना कौटुंबिक किंवा पालकांच्या उत्पन्नमर्यादेची अट ठेवण्यात आलेली नाही.

कलाकारांसाठी आपत्कालीन आधार योजनेची घोषणा

राज्यातील कलोपजीवी म्हणजेच संबंधीत कला हेच उदरनिर्वाचे साधन असलेल्या कलाकारांसाठी लवकरच खास योजना सुरु होणार असल्याची घोषणा मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी केली. कोरोनाच्या काळात गेले वर्षभर संगीत, नाटक व अन्य कलांच्या सादरीकरणावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचा मोठा फटका राज्यातील कलोपजीवी कलाकारांना बसलेला आहे. अशा कलाकारांच्या भवितव्याचा विचार करुन ही योजना तयार करण्यात येणार आहे. भविष्यात कोरोनासारखे एखादे संकट कोसळल्यास अशा कठिण काळात कलाकारांना सरकारतर्फे आपत्कालीन आर्थिक आधार मिळणार आहे. त्यासाठी खास समिती नियुक्त करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत ती जाहीर होणार आहे. राज्यातील प्रमाणित कलाकारांची यादी तयार करुन सदर समिती या योजनेवर काम करणार असल्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.

शांताराम कोलवेकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला मंदिरचे संचालक गिरीश वेळगेकर यांनी केले तर संचालक किरण नाईक यांनी आभार मानले.

Related Stories

मुंबईत अडकलेले दांपत्य रविवारी गोव्यात

Omkar B

सरकारची संवेदनशीलता कोसळीय : कामत

Amit Kulkarni

शनिवारी सापडले 180 बाधित

Patil_p

मडकईतील जनतेचे ऋण फेडता येतील

Patil_p

आगोंद येथील 50 कार्यकर्ते भाजपात

Omkar B

दुसऱया लाटेचे गांभीर्य ओळखावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!