तरुण भारत

धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धीकडून 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

प्रतिनिधी / बेंगळूर

धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी संघातर्फे रविवारी 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 20 व्हेंटिलेटर मदत म्हणून राज्य सरकारकडे हस्तांतर करण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारसोबत राहून सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी धर्मस्थळचे धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांचे आभार मानले आहेत. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी योजनेतून विविध प्रकारची मदत करण्यात आली आहे. रविवारी या संघटनेने बेंगळूर शहर व बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ांसाठी 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 2 व्हेंटिलेटर्सची मदत दिली आहे. धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेच्या मुख्य अधिकाऱयांनी रविवारी नेलमंगलचे तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकाऱयांकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हस्तांतर केले. आता विविध जिल्हय़ांमध्येही या उपकरणांचे वाटप केले जाणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सांगितले आहे.

Advertisements

Related Stories

प्रत्येक आशा कर्मचाऱ्यास १० जणांना लसीकरण करावे लागणार

Abhijeet Shinde

तृतियपंथीयांना नोकरीत 1 टक्का आरक्षण

Amit Kulkarni

यंदाही सौंदत्ती यात्रा रद्द

Sumit Tambekar

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार: भाजपचे वरिष्ठ नेते अस्वस्थ

Abhijeet Shinde

बेंगळूमध्ये १ ऑक्टोबरपासून जवळपास ६० हजार रुग्णांची नोंद

Abhijeet Shinde

कर्नाटक सरकारच्या निर्णयाच्या विरोधात सोमवारी एपीएमसी बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!