तरुण भारत

इंधन भडका सुरूच; पुण्यात पेट्रोल 100 पार

ऑनलाईन टीम / पुणे : 


देशात आज पेट्रोल आणि डीझेलच्या किमतींमध्ये आज देखील दरवाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 29 पैश्यांची वाढ झाली आहे. मुंबई, पुणे शहरात तर पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे.

Advertisements
  • पुण्यात पेट्रोल 100.15 रुपये 


पुण्यात पहिल्यांदाच पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पुण्यात मागील आठवड्यात पेट्रोलचे दर 99.87 रुपये इतका होता. त्यात आज वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रति लिटर 100.15 रुपये इतका झाला आहे. तर पॉवर पेट्रोल 103.83 रुपये इतके झाले आहे. तर डिझेलसाठी 90.71 रुपये मोजावे लागत आहे. 

मुंबईत देखील पेट्रोलने शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 100.47 रुपये तर डिझेल 92.45 रुपये इतके झाले आहे. दिल्लीत पेट्रोल 94.23 रुपये तर डिझेल 85.15 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 95.76 रुपये तर डिझेल 89.90 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 94.25 रुपये तर डिझेल 87.74 रुपये इतके वाढले आहे.

  • परभणीत पेट्रोल 102.57 रुपये 


परभणीमध्ये पेट्रोलसाठी 102.57 रुपये तर डिझेलसाठी 93.04 रुपये मोजावे लागत आहेत. 

  • भोपाळमध्ये पेट्रोल 102.34 रुपये 


भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोल 102.34  रुपये मिळत आहे. तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर इतके आहे. 

  • दररोज 6 वाजता किमती बदलतात


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. 


आज सोमवारी कच्च्या तेलात भाववाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडचा भाव 4 टक्क्यांनी वधारला होता. तीच तेजी आज कायम आहे. ब्रेंट क्रूडचा भाव 7 सेंट्सने वधारला असून तो 68.79 डाॅलर प्रती बॅरल झाला. यूएस टेक्सासमध्ये क्रूडचा भाव 13 सेंट्सने वधारला आणि 66.45 डाॅलर प्रती बॅरल झाला.

Related Stories

पुण्यात ‘कोरोना’मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढतेय, ही दिलासादायक बाब : उपमुख्यमंत्री

Rohan_P

चीनविरोधात 27 देशांकडून तक्रार याचिका दाखल

datta jadhav

शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याचा सोमय्यांचा आरोप

triratna

पुदुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले!

datta jadhav

अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स

triratna

चार श्रीमंत व्यावसायिकांच्या संपत्तीत वाढ

Patil_p
error: Content is protected !!