तरुण भारत

सांगली : राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लवकरच लोकार्पण करणार – महापौर दिग्विजय सूर्यवंशी

अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी / कुपवाड

Advertisements

सांगली जिल्ह्याच्या लौकीकात भर पडेल असे महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. लवकरच या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी येथे बोलताना दिली.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती प्रभाग आठमधील राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे उत्साहात साजरी करण्यात आली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते अहिल्यादेवी ज्ञानज्योतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर सूर्यवंशी बोलत होते.

आमदार सुधीर गाडगीळ यांसह सभापती पांडुरंग कोरे, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड, सहाय्यक आयुक्त खरात, राहुल पवार शेखर माने, माजी महापौर संगीता खोत, कल्पना कोळेकर, नसीमा नाईक, अर्पणा कदम, उर्मिला बेलवलकर, सविता मदने, मदिना बारुदवाले, धीरज सूर्यवंशी, राजेंद्र कुंभार, गजानन आलदर, संजय यमगर, महेश सगरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अहिल्यादेवींच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेतील विविध पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

सांगली : कुडणूर येथे एकाच आठवड्यात आठ‌ जणांचा मुत्यू

Abhijeet Shinde

सांगली : रस्ता रुंदीकरणासाठी होणार झाडांची कत्तल

Abhijeet Shinde

खाजगी सुत गिरणी संघटना अध्यक्षपदी आमदार संजयमामा शिंदे यांची निवड

Abhijeet Shinde

सांगली : मार्केट यार्डामधील पाच दुकानावर कारवाई; ५० हजार रुपयांचा दंड वसूल

Abhijeet Shinde

सांगली (मिरज) : शिक्षण कर्जाच्या अमिषापोटी 65 हजारांची फसवणूक

Abhijeet Shinde

चैनीसाठी बोकडे चोरणाऱ्या चोरट्यांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!