तरुण भारत

ममता वादळ थांबता थांबेना ; अल्पन बंडोपाध्याय यांची केली मुख्य सल्लागारपदी नियुक्ती

कोलकता / ऑनलाईन टीम

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने केंद्र शासन विरूद्ध ममता सरकार यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचला आहे. यापूर्वी केंद्राकडून घेण्यात आलेल्या चक्रीवादळ नुकसान आढावा बैठकीवेळी ते स्पष्ट देखील झाले आहे. पंतप्रधान मोंदीनी प्रारंभीच्या बैठकीत ममतांना बोलण्यास वेळ दिला नव्हता, यावरुन ममतांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. या नंतरच्या बैठकीत मात्र ममता उशीरा पोहोचल्या होत्या. तसेच नुकसान झालेल्या भागाचा अहवाल देत त्यांनी तेथून काढता पाय घेतला होता.

यावर राज्याचे मुख्य सचिव अल्पन बंडोपाध्याय यांनी दिल्लीत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांनी एक पाऊल पुढे टाकत अल्पन बंडोपाध्याय यांना मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केले आहे. तसेच मुख्य सचिवपद पद हरिकृष्ण द्विवेदी यांच्याकडे सोपवलं आहे. अल्पन बंडोपाध्याय यांना तीन महिन्यांचा अवधी वाढवली आहे. ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते. मात्र ममता यांनी आमचे मुख्य सचिव आज सेवानिवृत्त झाले असले तरी ते मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून तीन वर्षे सेवा करतील, असे सांगितलं आहे.

अल्पन बंडोपाध्याय कोण आहेत ?

अल्पन बंडोपाध्याय हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. ते नियमांचे पालन करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वारंवार कौतुक केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्राने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना रिलीव करण्यास सांगितलं होतं. मात्र या आदेशानंतरही राज्य सरकारने त्यांना रिलीव केलं नव्हतं.

Advertisements

Related Stories

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी झेडपीच्या काही विभागात शुकशुकाट

Patil_p

अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

भाजप नेत्या ज्याच्याशी फोनवर बोलल्या तो सचिन तेंडुलकर असावा – सचिन पायलट

Abhijeet Shinde

महाराष्ट्र, केरळमधून येणाऱ्यांना ‘निगेटिव्ह अहवाल’ सक्तीचा

Patil_p

कृषी विधेयकप्रकरणी केंद्र सरकारला नोटीस

Omkar B

ही मोर्चे काढण्याची वेळ नाही: खासदार संभाजीराजेंचा पुनरुच्चार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!