तरुण भारत

फिनलंड पंतप्रधानांच्या महागडय़ा नाश्त्याची चर्चा

शौकिनांसाठी जगात एकाहून एक महाग असलेले बेकफास्ट आहेत. काही वर्षांपूर्वी न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱया नाश्त्याचा दर सुमारे 27 लाख रुपये होता, यात प्रेंच खाद्यपदार्थांवर सोने आणि चांदीचा मुलामा असायचा.

फिनलंडच्या अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान सना मरिन वेगळय़ाच कारणामुळे चर्चेत आहेत. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाच्या नाश्त्याकरता दर महिन्याला शासकीय निधीतून मोठा खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. सना यांनी ब्रेकफास्टवर दर महिन्याला सुमारे 26,500 रुपये खर्च केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पण सना यांनी केलेला हा खर्च जगातील सर्वात महागडय़ा नाश्त्यांसमोर काहीच नाही.

Advertisements

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांनी स्वतःच्या कार्यकाळात एका चॅरिटीदरम्यान मागविलेला नाश्ता जगातील सर्वात महागडा ब्रेकफास्ट मानला जातो. अबॉट यांनी आंब्यांचा एक ट्रे मागविला होता, ज्याची किंमत सुमारे 27 लाख रुपये होती. पण अबॉट यांनी हे सर्व आंबे खाल्ले नव्हते, तर दुसऱया दिवशी त्यांनी ते एका मुलांच्या रुग्णालयात वाटले होते.

काही वर्षांपूर्वीपर्यंत न्यूयॉर्कच्या टिफनीमध्ये मिळणाऱया ब्रेकफास्टची किंमत सुमारे 27 लाख रुपये होती. सर्वसाधारणपणे दिग्गज कलाकार तेथे यायचे आणि प्रेंच बेकफास्टचा आनंद घ्यायचे. तसेच जगातील सर्वात महागडी कॉफी कोपी लुआक तेथे मिळायची. याचबरोबर सोने आणि चांदीच्या आवरणातील शॅम्पेनची बॉटल सादर केली जायची.

2014 मध्ये क्रिस्पी क्रिमी या अमेरिकेतील डोनेट कंपनीने ब्रिटनमये जगातील सर्वात महागडा डोनेट विकला होता. यात चॉकलेट नव्हे तर उत्तम गुणवत्तेचे शॅम्पेन भरलेले होते तसेच त्यावर 24 कॅरेटच्या सोन्याची पाने सजविण्यात आली होती. यावर सोने आणि हिऱयाचा खाण्यायोग्य चुराही टाकण्यात आला होता. मॅनहॅटनच्या एका रेस्टॉरंटमध्ये सुमारे 72 हजार रुपयांचे एक आम्लेट विकण्यात आले होते. यात 6 अंडय़ांसह लॉबस्टरही टाकण्यात आले होते.

Related Stories

अमेरिकेतील भारतीयांची दमदार कामगिरी

Patil_p

‘हे’ तीन पत्रकार आहेत मागील दोन महिन्यांपासून गायब

prashant_c

न्युझीलंड आता कोरोना संसर्गमुक्त

Patil_p

हिमालयात आलेत नवे अतिथी

Patil_p

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदसह सहा जणांची निर्दोष मुक्तता

Abhijeet Shinde

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल – परराष्ट्र मंत्री जयशंकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!