तरुण भारत

पीएफमधून ‘ऍडव्हान्स’ काढण्यास परवानगी

कोरोना संकटात दुसऱयांदा दिलासा , ईपीएफओने दिली परवानगी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱयांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) कोरोना विषाणूच्या दुसऱया लाटेत होरपळलेल्या ग्राहकांना पीएफ खात्यातून दुसऱयांदा ‘कोविड-19 ऍडव्हान्स’ काढण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे आपत्कालीन गरजा भागविण्यासाठी या पैशांचा वापर केला जाऊ शकतो. तसेच रोजगार गमावलेल्या किंवा वेतनकपात झालेल्यांना या निधीची मदत होऊ शकते.

पीएफ सदस्यांना तीन महिन्यांपर्यंतच्या वेतनाइतकी (बेसिक वेतन आणि महागाई भत्ता) किंवा त्यांच्या भविष्य निर्वाह खात्यात जमा निधीतील 75 टक्क्मयांपर्यंतची रक्कम यापैकी कमी असलेला निधी काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर किंवा ऑनलाईन माध्यमातून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तीन दिवसात ग्राहकांच्या बँकखात्यात पैसे जमा होऊ शकतात. यासंबंधी माहिती देताना ‘ईपीएफओने कोरोना साथीच्या दुसऱया लाटेदरम्यान पीएफ भागधारकांना दुसऱया वेळी मदत करण्यासाठी ‘कोविड-19 ऍडव्हान्स’ घेण्यास परवानगी दिली असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

कोरोनादरम्यान आर्थिक गरज भागविण्यासाठी मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (पीएमजीकेवाय) अंतर्गत विशेष पैसे काढण्याची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा देशात कोरोना संसर्ग वाढल्यामुळे लादण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कामगारांचे आर्थिक बजेट कोलमडलेले आहे. अशा स्थितीत कामगार पीएफमधील खात्यातील रक्कम वापरू शकतात.

Related Stories

अल्पवयीन मुलामुलीचा वर्गातच विवाह

Patil_p

अमित शाहांवर गुन्हा का दाखल केला नाही? कर्नाटक उच्च न्यायालयाचा पोलीस आयुक्तांना सवाल

Abhijeet Shinde

दिल्ली : नववी, अकरावीची परीक्षा रद्द; शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांची माहिती

Rohan_P

उत्तराखंडमध्ये प्रवासी वाहनाला भीषण अपघात; १३ जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

गुजरात समुद्रहद्दीतून पाकिस्तानी बोट जप्त

Patil_p

‘नकारात्मक’ नव्हे ‘स्थिर’

Patil_p
error: Content is protected !!