तरुण भारत

ग्रा. पं. कर्मचाऱयांना कोरोना योद्धा घोषित करा

जिल्ह्य़ातील विविध ग्रा. पं. कर्मचाऱयांचे मागण्यांसाठी धरणे आंदोलन

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

ग्रामीण प्रदेशातील प्रत्येक गावात स्वच्छता करणे, पाणीपुरवठा करणे यासह सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी अशी कामे ग्राम पंचायतीचे कर्मचारी करत आहेत. तथापि, त्यांना गेल्या दहा-बारा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे त्यांची परवड सुरू आहे. ग्रा. पं. कर्मचाऱयांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करावे व त्वरित वेतन द्यावे. तोपर्यंत कामाला सुरुवात करणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेत जिल्हय़ातील विविध ग्राम पंचायतींसमोर धरणे सत्याग्रह सुरू आहे.

कोविडची दुसरी लाट अत्यंत तीव्र झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रा. पं. कर्मचाऱयांना ग्रामीण भागात जनजागृती व अन्य कामांसाठी पाठविले जाते. गेल्या वषीच्या कोविड काळात ग्रामपंचायत कर्मचाऱयांनी अहोरात्र काम केले. त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती, पण ती मागणी सरकारने पूर्ण केली नाही.

आता दुसऱया लाटेत ग्रामीण भागात कोरोना तीव्रपणे वाढतो आहे. पुन्हा ग्रा. पं. कर्मचारी अखंड काम करत आहेत. परगावांतून, परराज्यांतून आलेल्या प्रत्येकांचा अहवाल ठेवण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. याशिवाय अनेक कामे ते करत आहेत. परंतु सरकार त्यांना कोरोना योद्धा म्हणून घोषित करत नाही. काम करणाऱया बेळगाव, चिकोडी येथील प्रत्येकी दोन व बैलहोंगलमधील एकाचा मृत्यू झाला आहे. वॉटरमन, स्विपर, तसेच बिल कलेक्टर व साहाय्यक कर्मचारी यांचे वेतन त्यांच्या खात्यावर जमा करावे या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. मंजूर झालेले वेतन जलजीवन मिशनकडे वर्ग करण्यात आले आहे. वेतन नसल्याने कर्मचाऱयांची परवड होत आहे. त्याचप्रमाणे डाटा एंट्री ऑपरेटर यांनाही वेतन मिळाले नाही. जिल्हय़ात एकूण 102 ग्राम पंचायती आहेत. तेथील कर्मचाऱयांना त्वरित वेतन मिळावे व कोरोना योद्धा म्हणून त्यांना घोषित करावे, या मागणीसाठी धरणे धरण्यात येत असल्याचे ग्रामपंचायत नोकर संघाचे मुख्य कार्यवाह जी. एम. जैनिखान यांनी सांगितले.   

Related Stories

कोरोना महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान द्या !

Rohan_P

शहापूर येथील हेस्कॉमचे कार्यालय हलविले

Patil_p

शेतकऱयांवर अस्मानी संकटाची छाया

Amit Kulkarni

मास्टर्स स्पर्धेत बेळगावच्या ज्येष्ठ क्रीडापटूंचे घवघवीत यश

Amit Kulkarni

उद्यमबाग येथील एफएल एक्स्पर्ट येथे रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप

Patil_p

कोरोना काळात लॅब टेक्निशियनची सेवा कौतुकास्पद

Omkar B
error: Content is protected !!