तरुण भारत

जत-जांबोटी रोडवरील खोकी हटाव मोहिमेला गती

खानापुरातील बसवेश्वर सर्कला झाला मोकळा : शेकडो खोकीधारकांवर बेकारीची कुऱहाड

खानापूर ः खानापूर शहरातील श्री बसवेश्वर चौक (जांबोटी क्रॉस सर्कल)परिसरात जत-जांबोटी रस्त्यावर बेकायदेशीररित्या घालण्यात आलेली शेकडो खोकी हटाव मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली आहेत. यामुळे जांबोटी सर्कल परिसरात गेल्या अनेक वर्षापासून या खोक्मयाच्या आधारावर व्यवसाय करत उपजीविका भागवणाऱया अनेक व्यावसायिकांवर बेकारीची कुऱहाड ओढवली आहे.

Advertisements

खानापूर शहरातील श्री बसवेश्वर चौक परिसरातील जांबोटी रोड तसेच पारिश्वाड रोडकडे जाणाऱया रस्त्यावर दुतर्फा गेल्या अनेक वर्षापासून शेकडो खोकी घालून व्यवसाय करणारे अनेकजण आहेत. पण दुतर्फा थाटलेल्या खोकी व्यवसायामुळे जत-जांबोटी महामार्गावरील वाहतुकीत मोठी अडचण होत होती. जांबोटीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतुकीचा बोजवारा उडत होता. त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीच्या अडचणीबाबत तक्रारी वाढल्या होत्या.

 आता जत-जांबोटी या राज्य महामार्गाच्या विकासाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवाजीनगरपासून खानापूर बसवेश्वर सर्कलपर्यंत तसेच चौराशीदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता आता विकासाच्या उंबरठय़ावर आहे. शिवाजीनगरपासून तालुका क्रीडांगणाजवळ असलेल्या हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. पण बसवेश्वर सर्कलजवळ असणाऱया खोक्यांच्या अडचणीमुळे रस्त्याचे काम गेल्या आठवडाभरापासून कंत्राटदाराने थांबवले आहे. हा रस्ता रुंदीकरण करण्यात येत असून दुतर्फा खोकी हटाव केल्याशिवाय या रस्त्याची दुरुस्ती करणे कठीण होते. यामुळे आता या रस्त्याच्या दुतर्फा थाटण्यात आलेली शेकडो खोकी हटाव मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहेत. येथील खोकीमालकांना दोन दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तीन दिवसाच्या आत सदर स्वतःहून खोकी हटाव करण्यात आली नाहीतर जेसीबी लावून करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे खोकीधारकांनी स्वयंप्रेरणेने रविवारपासून याठिकाणी खोकी हटविण्यास प्रारंभ केला आहे. सोमवारी दिवसभर या ठिकाणी बरीच खोकी हटवण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील दुतर्फा झालेली अडचण आता दूर झाली आहे. त्याप्रमाणे बसवेश्वर सर्कलपासून चौराशी मंदिरकडे जाणाऱया राज्य महामार्गावर देखील बस आगाराच्या बाजुने अनेक खोकी बेकायदेशीररित्या थाटण्यात आली आहेत. याही खोकीधारकांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटिसा बजावली असल्याचे समजते.सद्यपरिस्थितीत गेल्या दोन वर्षात सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक लोकांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. जांबोटी रोडवर अनेक रोजंदारीवर जगणारे लोक खोकी घालून आपली उपजीविका घालवत होते. आता एक तर डाऊनमुळे कोणताच धंदा नाही त्यामुळे कुटुंबात आता उत्पन्नाचा आधारच राहिला नाही. त्यामुळे आता खोकी हटाव करण्यात आल्याने पुढील आपण जीवन जगावे कसे, हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे.

Related Stories

मराठी भाषिकांत ऐक्य राखणे हीच हुतात्म्यांना आदरांजली

Amit Kulkarni

रस्ता बनला पार्किंग तळ, वाहनधारकांची तारांबळ

Patil_p

फायनान्स धारकांकडून होणारा त्रास थांबवा

Patil_p

रेल्वे ओक्हरब्रिज खुले करा

Patil_p

बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

ढगाळ वातावरणामुळे वीट उत्पादक-मंजूर चिंतेत

Patil_p
error: Content is protected !!