तरुण भारत

विहिरीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद, पोलीस तपास सुरू

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

रविवारी अतिवाड शिवारात पळून जाताना विहिरीत पडून मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. हा तरुण पार्वतीनगर-कंग्राळी बी. के. येथील राहणारा होता. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

मनोहर भरत हुंदरे (वय 25, मूळचा रा. सदाशिवनगर, सध्या रा. पार्वतीनगर, कंग्राळी बी. के.) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील भरत पुन्नाप्पा हुंदरे यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून सीआरपीसी कलम 174 (सी) अन्वये संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी उत्तरीय तपासणीनंतर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय. आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रविवारी आपल्या मित्रांसमवेत तो पार्टीसाठी अतिवाड शिवारात गेला होता, असे पोलिसांनी सांगितले.

यासंबंधी मनोहरच्या वडिलांनी फिर्याद देऊन आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणात संशय व्यक्त केला आहे. 30 मे रोजी मित्रांसमवेत तो पार्टीसाठी म्हणून अतिवाड शिवारात गेला होता. त्यावेळी कोणी तरी पोलीस आले असे ओरडल्यामुळे पळून जाताना विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाला आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान विहिरीत पडलेल्या आणखी दोघा जणांना वाचविण्यात आले आहे.

Related Stories

विविध संघटनांची जिल्हाधिकाऱयांना निवेदने

Omkar B

गरिबांच्या फ्रीजला वाढती मागणी

Amit Kulkarni

खानापूरला विशेष अनुदान मंजूर करा

Omkar B

हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाचा 6 गडय़ांनी विजय

Amit Kulkarni

शेतकऱयांनी मोबाईल ऍपवर पीक नोंद करावी

Patil_p

शेततळय़ात पडून 4 बालकांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!