तरुण भारत

”केंद्राने राज्यांविरोधात डोकं लावण्यापेक्षा कोरोनाविरुद्धात लावावे”

नवी दिल्ली / ऑनलाईन टीम

कोरोना लसीकरण आणि याबाबतचे केंद्र सरकारचे कमी पडत असलेले नियोजन यावरुन अनेक राज्यांची केंद्राबरोबर धुसफूस चालू आहे. यातच आता दिल्लीची भर पडली असून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर कोरोना लसीकरणावरुन टीका केले आहे. केंद्राने राज्यांविरोधात डोकं लावण्यापेक्षा करोनाविरुद्धात लावावे, असे ट्वीट मनिष सिसोदिया यांनी करत केंद्रावर निशाणा साधला आहे.

भाजपने दिल्ली प्रशासन कोरोना मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप केला होता. यावरुन मनिष सिसोदीया यांनी ट्विटवरुन केंद्राला टोला लगावला आहे. केंद्र सरकारने आपले डोके राज्य सरकारांसोबत राजकिय खेळी करण्यासाठी वापरण्याऐवजी त्यापैकी एक टक्के जरी कोरोना लढाई विरुद्ध वापरले तरी कोरोनाचा मृत्यू तांडव घडला नसता. आणि देशातील नागरिकांचा बळी गेला नसता. याबरोबर सिसोदिया यांनी म्हटले आहे की, ज्याची जशी मानसिकता तसेच तो विचार करत असतो. अशाप्रकारे त्यांनी केंद्र सरकाचा खरपूस समाचार घेतला आहे.

Advertisements


केजरीवाल सरकारवर भाजपकडून नेमकी काय टीका करण्यात आली होती ?

दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी दिल्लीस्थित केजरीवाल सरकारवर टीका करत मृतांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप सोमवार दिनांक ३१ मे रोजी केला होता. तसेच जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांच्या बाता करता करता केजरीवाल सरकारने दिल्लीला प्रती १० लाख व्यक्तींमधील मृत्यूच्या यादीत आघाडीवर आणून दाखवण्याच काम केल्याची टीका गुप्ता यांनी केली होती.

Related Stories

कोरोना उपचारासंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी

Patil_p

नौसेनेचे ग्लायडर कोसळले; दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

साऱयांची दृष्टी नंदीग्रामवर केंद्रीत

Patil_p

धोका वाढला : महाराष्ट्रात 16,620 नवे कोरोना रुग्ण; 50 मृत्यू

Rohan_P

परराज्यातून घरी परतणाऱ्या बिहारी मजुरांचा खर्च बिहार सरकार करणार : नितीश कुमार

Rohan_P

सातारा : जिल्ह्यातील 119 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित, दोन बाधिताचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!