तरुण भारत

राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक ;शरद पवार कार्यालयात पोहोचले


मुंबई \ ऑनलाईन टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पक्षाचे आमदार व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. बैठकीसाठी शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे, अदिती तटकरे, संजय बनसोडे, प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार व शरद पवार हे नेत्यांना काय मार्गदर्शन करणार, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

पित्ताशयावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरद पवार हे गेले काही दिवस दैनंदिन राजकीय घडामोडींपासून दूर होते. आता त्यांची प्रकृती उत्तम असून ते पुन्हा एकदा पक्षाच्या कामात सक्रिय झाले आहेत. त्याच वेळी राज्यात वेगवेगळे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजच्या बैठकीबाबत माहिती दिली होती. पवारसाहेब हे पक्षाचे प्रमुख नेते व मंत्र्यांची बैठक वरचेवर घेत असतात. त्यातून पक्षाच्या व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. त्यासाठीच ही बैठक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याजिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, कोविड व अन्य प्रश्नांची माहिती पवारसाहेब घेतील. त्यानंतर ते सर्वांना मार्गदर्शन करतील, असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

Advertisements

Related Stories

‘अमृत’ च्या नावाखाली ‘विष’?

Abhijeet Shinde

किराणामाल, भाजी विक्रेत्यांकडून काळाबाजार

Patil_p

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

मुंबईतील शिक्षकांना पुढील आदेशापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’

Rohan_P

बंगळूरमध्ये जपला जातोय कोल्हापूरच्या दातृत्वाचा वारसा

Abhijeet Shinde

मनपा क्षेत्रातील ८४ हजार लाभार्थ्यांना मिळणार बूस्टर डोस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!