तरुण भारत

किणीत जुगार खेळताना छापा १ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट


याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दि ३१ मे रोजी किणी ते चुंगी जाणाऱ्या रस्त्यालगत जगदंबा हॉटेलच्या पाठीमागे आंब्याच्या झाडाखाली काही लोक 52 पानी पत्त्याचा मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची खबर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याला मिळाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी जुगार खेळणाऱ्या लोकांवर अचानकपणे छापा टाकून त्यांच्याजवळील रोख रक्कम मोबाईल वाहन असा एकूण १ लाख ५८ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisements

या प्रकरणात संशयित आरोपी संजय धनु पवार (वय ३८ रा. चुंगी), सलीम इस्माईल मुल्ला (वय ३९ रा.किणी), बाबू शामराव विटकर (वय ४१ रा सुलतानपूर ), अजित अप्पाराव पाटील (रा मुस्ती) यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून १ आरोपी फरार असून इतर तिघांना नोटीस बजावली आहे. या गुन्ह्यात ४ मोटारसायकल, एक मोबाईल फोन व १६०० रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस कॉ. भीमराव खंडागळे यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अंगद गीते हे करीत आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील किणी चुंगी रोडवरील जगदंबा हॉटेलच्या पाठीमागे आंब्याच्या झाडाखाली ५२ पत्याचा मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून १ लाख ५८ हजार १३० रुपये मुद्देमाल जप्त करून चौघांवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना किणी येथे दि ३१ मे रोजी घडली.

Related Stories

मोठी कारवाई : दिवाळीच्या तोंडावर 20 लाखाचा भेसळ खवा जप्त

Abhijeet Shinde

सोलापूर : तब्बल १ तास सिटूकडून आक्रमक रास्तारोको

Abhijeet Shinde

लॉकडाऊन नियमांचा भंग; सोलापूर जिल्ह्यात १ कोटी ८४ लाखांचा दंड वसूल

Abhijeet Shinde

सोलापूर : ऑनलाईन शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत,वाढ कि अभाव

Abhijeet Shinde

गुरववाडीसह अक्कलकोटमध्ये 8 नवे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde

घडय़ाळवाले आता आमचे पार्टनर : उद्धव ठाकरे

prashant_c
error: Content is protected !!