तरुण भारत

होमवर्कने त्रस्त मुलीची ‘मोदी साब’कडे तक्रार

उपराज्यपालांनी घेतली तक्रारीची दखल

देशात कोरोना संकटात शाळा बंद आहेत. दीर्घकाळापासून घरांमध्ये कैद मुले शाळांपासून दूर आहेत. अशा स्थितीत त्यांच्या शिक्षणाला फटका बसू नये म्हणून ऑनलाईन वर्गांची व्यवस्था सुरू झाली. पण मुलांमध्ये ऑनलाईन वर्ग त्रासाचे कारण ठरू लागले आहेत.

Advertisements

सोशल मीडियावर एका अशाच 6 वर्षीय मुलीची तक्रारवजा चित्रफित चर्चेत आली आहे. या चित्रफितीतील मुलीच्या तक्रारीची दखल जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱया 6 वर्षीय मुलीने ऑनलाईन वर्गांमुळे नाराज होत एक चित्रफित प्रसारित केली आहे. यात ही मुलगी शाळेकडून दिला जाणारा होमवर्क आणि दीर्घवेळ चालणाऱया वर्गांमुळे त्रस्त असल्याचे सांगते.

माझा ऑनलाईन वर्ग 10 वाजता सुरू होतो आणि 2 वाजेपर्यंत चालतो, ज्यात इंग्रजी, गणित, उर्दू आणि ईव्हीएस शिकावे लागते. ‘मोदी साब’ मुलांना अखेर इतकं काम का करावं लागतं असे ही मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून म्हणत असल्याचे चित्रफितीत दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करणाऱया एका चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काश्मीरमध्ये राहणाऱया या मुलीच्या निरागस तक्रारींची सर्वजण दखल घेत आहेत.

हा व्हिडिओ प्रचंड शेअर झाल्याने जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही पाऊल उचलले आहे. “अत्यंत निरागस तक्रार. शालेय विद्यार्थ्यांवरील होमवर्कचा भार कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला 48 तासांमध्ये धोरण तयार करण्याचा निर्देश दिला आहे. मुलांची निरागसता देवाने दिलेली भेट असून त्यांचे दिवस जिवंत आणि आनंदाने भरलेले असावेत’’ असे सिन्हा यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.

Related Stories

भारतीय तांदळाला चीनचे आव्हान

Patil_p

केजरीवाल सरकारने लपविला कोरोनाबळींचा आकडा

Amit Kulkarni

शहतूत धरणासंबंधी भारत-अफगाणिस्तान यांच्यात करार

Patil_p

देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘या’ स्थानी

Rohan_P

एच-1बी व्हिसावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात दिलासा

Patil_p

जम्मू लष्करी स्थानकाजवळ 2 अज्ञात ड्रोनचा वावर

datta jadhav
error: Content is protected !!