तरुण भारत

महागाईदरम्यान किंचित दिलासा

19 किलोचा सिलिंडर 122 रुपयांनी स्वस्त

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

एलपीजी सिलिंडरप्रकरणी काहीसा दिलासा मिळाला आहे. कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या वाणिज्यिक वापराच्या सिलिंडरच्या दरात 122 रुपयांची कपात की आहे. नवा दर 1 जूनपासून लागू झाला आहे. राजधानी नवी दिल्लीत वाणिज्यिक वापराचा सिलिंडर आता 1473.5 रुपयांना मिळणार आहे.

परंतु 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे रोजी देखील वाणिज्यिक वापराच्या सिलिंडरच्या दरात 45.50 रुपयांची कपात करण्यात आली होती.

डिसेंबरपासून आतापर्यंत घरगुती सिलिंडरच्या दरात 215 रुपयांची भर पडली आहे. मागील 7 वर्षांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा (14.2 किलोग्रॅम) दर दुप्पट होऊन 809 रुपये (शहर अन् राज्यांनुसार दर वेगवेगळा) प्रति सिलिंडर झाला आहे. 1 मार्च 2014 रोजी 14.2 किलोंचा घरगुती सिलिंडर 410.5 रुपयांना मिळत होता.

Related Stories

भारताने चिंता करू नये : रशिया

Patil_p

भारतात कोरोना रुग्णसंख्या मंदावतेय

datta jadhav

उत्तरप्रदेशात 40 टक्के महिलांना उमेदवारी; प्रियंका गांधींची घोषणा

datta jadhav

कोरोनाग्रस्तांसाठी ओडिशाकडून देशातील सर्वात मोठे रुग्णालय

tarunbharat

अमित शहा-पवार भेटीमुळे तर्कवितर्क

Patil_p

खासगी कंपन्या रॉकेट, उपग्रह तयार करतील : के. सिवन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!