तरुण भारत

नफा वसुलीमुळे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण

सेन्सेक्स 2 तर निफ्टी 7 अंकांनी प्रभावीत, बँकिंग समभाग तोटय़ात 

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisements

देशातील शेअर बाजारात मंगळवारच्या सत्रात नफावसुलीच्या प्रभावाने बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही भांडवली बाजारात घसरणीची नोंद झाली आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक कल राहिल्याच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी उच्चांकी पातळीवर नफावसुली केल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे मंगळवारचे सत्र घसरणीसह बंद झाले.

ट्रेडिंगच्या समाप्तीनंतर 30 समभागांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक दिवसअखेर 2.56 अंकांची हलकीशी घसरण नोंदवत 51,934.88 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 7.95 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक घसरणीसह 15,574.85 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमधील समभागांमध्ये सर्वाधिक नुकसानीत आयसीआयसीआय बँकेचे समभाग जवळपास 2 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेन्ट्स, आयटीसी, कोटक बँक, ऍक्सिस बँक आणि पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला ओएनजीसी, बजाज फायनान्स, भारतीय स्टेट बँक, बजाज ऑटो आणि एचडीएफसी आदींचे समभाग मात्र फायद्यात राहिले आहेत.

जागतिक पातळीवर सकारात्मक कल राहिल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यांचा निर्देशांक हलक्याशा घसरणीसह बंद झाला आहे. औषध कंपन्या वगळता जास्तीत जास्त निर्देशांक हे नुकसानीत राहिल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजबाबत गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण निर्माण झाले आहे पण यामध्ये निर्देशांकात मोठी घसरण आली आहे. मध्यम आणि लहान कंपन्यांचे समभाग हे मागील एक दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा नफावसूलीत राहिले आहेत. जागतिक बाजारांमध्ये आशियासह अन्य बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग आणि सोल हे लाभात राहिले. तर टोकीयोचा बाजार घसरणीत राहिला आहे. युरोपच्या अन्य प्रमुख बाजारांमध्ये तेजीचे वातावरण राहिले होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • ओएनजीसी….. 117
 • बजाज फायनान्स 5786
 • स्टेट बँक………. 432
 • बजाज ऑटो… 4230
 • एचडीएफसी.. 2579
 • टेक महिंद्रा…. 1030
 • हिंदुस्थान युनि 2358
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1474
 • एचसीएल टेक.. 950
 • सन फार्मा……. 671
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2168
 • बजाज फिनसर्व्ह 11832
 • नेस्ले……….. 17726
 • डॉ.रेड्डीज लॅब. 5310
 • अदानी पोर्टस्… 798
 • एलआयसी हाऊसिंग 477
 • टोरंटो फार्मा.. 2786
 • एबीबी इंडिया 1689
 • मॅरिको………… 480
 • डिव्हीस लॅब.. 4225
 • विप्रो………….. 542

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • आयसीआयसीआय 650
 • अल्ट्राटेक सिमेंट 6600
 • एशियन पेन्ट्स 2933
 • ऍक्सिस बँक….. 745
 • कोटक महिंद्रा. 1796
 • आयटीसी…….. 215
 • पॉवरग्रिड कॉर्प. 224
 • इन्फोसिस….. 1387
 • भारती एअरटेल 532
 • इंडसइंड बँक.. 1009
 • एनटीपीसी…… 110
 • एचडीएफसी बँक 1511
 • टायटन……… 1591
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 806
 • टीसीएस……. 3153
 • मारुती सुझुकी 7083
 • रिलायन्स इन्फ्रा.. 60
 • अरोबिंदो फार्मा 970
 • जेएसडब्ल्यू स्टील 694
 • वेदान्ता……….. 268
 • ?ज्युबिलंट फूड. 3054

Related Stories

कॉफी डेच्या सीईओपदी मालविका हेगडे

Omkar B

मसाला विक्रीमध्ये झाली घसरण

Patil_p

रिलायन्स इंडस्ट्रिज विदेशी टेलिकॉम कंपनी खरेदी करणार?

Amit Kulkarni

सप्ताहाच्या अंतिम दिवशी तेजीची उसळी

Patil_p

‘टेस्ला’च्या खरेदीची संधी ऍपलने गमावली!

Omkar B

ऍपलचे बाजारमूल्य दोन ट्रिलियन डॉलरच्या घरात

Patil_p
error: Content is protected !!