तरुण भारत

राज्यात लॉकडाऊन की अनलॉक; मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात लागू असलेला पूर्ण लॉकडाऊन ७ जून रोजी संपणार आहे. त्याच्याआधी मुख्यमंत्री बैठक घेऊन लॉकडाऊन कायम ठेवायचा की अनलॉक करायचा याविषयी मते जाणून घेणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री आज ४.३० वाजता लॉकडाऊन वाढीसंदर्भात बैठक घेणार आहेत.

बेंगळूर येथे मुख्यमंत्र्यांच्या गृहकचेरी कृष्ण येथे आज, बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला डॉक्टर्स, कोविड-१९ तज्ज्ञ उपस्थित असणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन कधी उठवायचा याविषयी माहिती घेतील. सर्वांशी चर्चा करूनच मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्री पुन्हा ६ वाजता मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री याबैठकीत डॉक्टर्स आणि कोविड-१९ तज्ज्ञ यांनी दिलेला सल्ला आणि सूचना मंत्र्यांपुढे ठेवतील आणि मंत्र्यांची मते जाणून घेतील. यांनतर तज्ज्ञ आणि मंत्र्यांचा सल्ला विचारात घेऊन मुख्यमंत्री गुरुवारी लॉकडाऊन की अनलॉक यासंदर्भात निर्णय जाहीर करतील.

Advertisements

Related Stories

बेंगळूर रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख स्वामी हर्षानंद यांचे निधन

Abhijeet Shinde

पंचमसाली समाजाने सरकारला १५ ऑक्टोबरपर्यंत दिली मुदत

Abhijeet Shinde

बेंगळूर अतिरेक्यांचे नाहीः जेडी (एस) नेते कुमारस्वामींनी खासदार सूर्या यांना फटकारलं

Abhijeet Shinde

बेंगळूर: सीसीबी पोलिसांकडून अभिनेत्रीच्या घराची झडती

Abhijeet Shinde

कर्नाटक : बुधवारी १२४० नवीन बाधितांची नोंद

Abhijeet Shinde

बेंगळूर हिंसाचार: माजी महापौर संपत राज यांची एनआयएकडून चौकशी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!