तरुण भारत

गूढ स्थितीत बुडाली इराणची सर्वात मोठी युद्धनौका

इराणच्या नौदलाला मोठा झटका

वृत्तसंस्था/ तेहरान

Advertisements

इस्रायलसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान इराणच्या नौदलाला अत्यंत मोठा झटका बसला आहे. ओमानच्या किनाऱयारव इराणच्या नौदलाची सर्वात मोठी युद्धनौका आग लागल्यावर बुडाली आहे. युद्धनौकेमधून आगीच्या उंच ज्वाळा दिसून आल्या आहेत. गूढपणे लागलेल्या आगीच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. खर्ग ही युद्धनौका इराणसाठी मुख्य तेल टर्मिनलच्या स्वरुपात काम करत होती.

आग लागल्यावर याच्या चालक दलाच्या सर्व सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. खर्ग युद्धनौका प्रशिक्षण मोहिमेकरता रवाना झाली होती अशी माहिती इराणच्या नौदलाने दिली आहे. रात्री सुमारे सव्वा दोन वाजता या युद्धनौकेत आग लागली आहे. अग्निशमन दलाने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला पण ही युद्धनौका जस्क बंदरानजीक बुडाली आहे.

नौदलासाठी महत्त्वाची युद्धनौका

चालक दलाचे सदस्य लाइफ जॅकेट घालून पाण्यात उतरत असल्याचे सोशल मीडियावर प्रसारित छायाचित्रांमध्ये दिसून आले आहे. आगीची तीव्रता अधिक असल्याने ती अंतराळातूनही दिसून आली आहे. खर्ग युद्धनौका इराणच्या नौदलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होती. अन्य युद्धनौकांची गरज भासल्यास ही युद्धनौका त्यांची जागा घेत होती. तसेच मोठय़ा प्रमाणात मालवाहतूक करण्यासह हेलिकॉप्टर्सही यावरून उड्डाण करू शकत होते. ही युद्धनौका 1977 मध्ये ब्रिटनने तयार केली होती आणि 1984 मध्ये इराणच्या नौदलात याचा समावेश करण्यात आला होता. इस्रायलसोबत तणावादरम्यान इराणच्या नौदलाला या घटनेमुळे मोठा झटका बसला आहे.

Related Stories

”पंतप्रधान मोदींसह त्यांच्या साथीदारांनी हजारो किलोमीटर भूप्रदेश चीनला दिला”

Abhijeet Shinde

तुर्कस्थानकडून तालिबानची वकीली

Patil_p

एर्दोगान यांच्यानंतर इम्रान यांची मॅक्रॉन यांना धमकी

Patil_p

ढाका येथील नदीत नौका बुडाली, 28 बळी

Patil_p

एकटाच पकडतो मगर

Patil_p

नेपाळ अन् चीनमध्ये वाढतेय अंतर

Patil_p
error: Content is protected !!