तरुण भारत

कॅफे सांभाळताहेत ऍसिड हल्ल्याच्या पीडिता

आगऱयातील चांगला पुढाकार,गरजूंना दिले जातेय मोफत अन्न

आगरा शहरातील शिरोज हँगआउट कॅफे गरजूंना मोफत अन्न पुरवत आहे. हा कॅफे ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिला चालवत आहेत. महामारीदरम्यान स्वतःचे दुःख विसरून या महिला लोकांना मदत करण्याचा शक्य तो प्रयत्न करत आहेत. या कॅफेत जगातील अनेक दिग्गज नेत्यांपासून बॉलिवूड तसेच हॉलिवूडच्या कलाकारांनी भेट दिली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये महामारीमुळे हा कॅफे बंद झाला होता. त्यानंतर 7 महिन्यांनी हा कॅफे पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

Advertisements

ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांकडून संचालित हा कॅफे पूर्णपणे दरवर्षी तेथे येणाऱया विदेशी पर्यटकांवर निर्भर आहे. कॅफेच्या माध्यमातून ऍसिड हल्ल्यातील पीडितांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मागील  एक वर्षात महामारीमुळे येथे येणाऱया ग्राहकांच्या संख्येत 75 टक्क्यांची घसरण झाली आहे. या महिलांकडे कॅफेत काम करण्याशिवाय उत्पन्नाचा कुठलाच अन्य मार्ग नसल्याचे कॅफेचे संस्थापक आशिष शुक्ला यांनी सांगितले आहे.

आशिष या महिलांच्या उपचारांचा खर्चही उचलतात तसेच त्यांना नियमित स्वरुपात प्रशिक्षणही देतात. आगरा येथील शिरोज कॅफेचे यश पाहता याची एका शाखा लखनौमध्येही सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

भारतनेटसाठी 19,041 कोटी मंजूर

datta jadhav

“कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू”

Sumit Tambekar

कोरोना काळात आता श्रद्धेचा बूस्टर डोस

Patil_p

सक्रिय रुग्णसंख्या 1.84 लाखांवर

datta jadhav

सत्तेसाठी नव्हे, सेवेसाठी आशीर्वाद द्या !

Patil_p

जन्मठेप भोगत असलेल्या राम रहीमला ‘या’ कारणासाठी मिळाली पॅरोल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!