तरुण भारत

न्यूझीलंडची सावध सुरुवात

इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी, पहिला दिवस- चहापानाअखेर 3 बाद 144,

लंडन / वृत्तसंस्था

Advertisements

दक्षिण आफ्रिकेचा जन्म असलेल्या, मात्र, न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेल्या डेव्हॉन कॉनवेच्या दमदार अर्धशतकामुळे किवीज संघाने यजमान इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानाअखेर 3 बाद 144 धावांपर्यंत मजल मारली. चहापानासाठी खेळ थांबवण्यात आला त्यावेळी, कॉनवे 131 चेंडूत 7 चौकारांसह 71 तर हेन्री निकोल्स 54 चेंडूत 10 धावांवर नाबाद राहिले होते.

न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर टॉम लॅथम व कॉनवे यांनी 16 षटकात 58 धावांची सलामी दिली. 16 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर लॅथमचा रॉबिन्सनने त्रिफळा उडवला. कौंटी क्रिकेटमध्ये लक्षवेधी मारा साकारुन राष्ट्रीय संघात स्थान संपादन करणाऱया रॉबिन्सनसाठी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हा पहिला बळी ठरला.

न्यूझीलंडचा कर्णधार व जागतिक स्तरावरील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, केन विल्यम्सनने सावध सुरुवात केली. मात्र, येथे मोठी खेळी साकारण्यात त्याला अजिबात यश आले नाही. विल्यम्सनला 33 चेंडूत केवळ 13 धावांवरच समाधान मानावे लागले. जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याचा त्रिफळा उडवला. कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसनने विल्यम्सनला बाद करण्याची ही सातवी वेळ ठरली. विल्यम्सनचा बॅकफूटवर जाऊन बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न फसला व चेंडूने बॅटची कड घेत यष्टी उद्ध्वस्त केली.

अनुभवी फलंदाज रॉस टेलर 10 धावांवरच बाद झाल्याने न्यूझीलंडला येथे आणखी एक धक्का बसला. तोही रॉबिन्सनचे सावज ठरला. यष्टीच्या रोखाने येणारा चेंडू मिड ऑन-मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसल्यानंतर रॉस टेलरला पायचीत होत परतावे लागले. टेलर बाद झाला, त्यावेळी इंग्लंडची 3 बाद 114 अशी स्थिती होती. अर्धशतकवीर कॉनवेने निकोल्सच्या साथीने संघाला चहापानापर्यंत 3 बाद 144 पर्यंत नेले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड पहिला डाव (चहापानाअखेर) ः 52 षटकात 3 बाद 144. (डेव्हॉन कॉनवे 131 चेंडूत 7 चौकारांसह 71, टॉम लॅथम 57 चेंडूत 2 चौकारांसह 23, रॉस टेलर 1 चौकारासह 14, हेन्री निकोल्स नाबाद 10. ओलि रॉबिन्सन 2-25, जेम्स अँडरसन 1-31).

Related Stories

बायचुंग भुतिया अध्यक्षपदासाठी उत्सुक

Patil_p

भारतीय खेळाडूंना वर्ल्ड ऍथलेटिक्स रिले स्पर्धा हुकणार

Patil_p

मॉर्गनवरही दंडात्मक कारवाई

Amit Kulkarni

पहिल्या दिवशी न्यूझीलंडचे वर्चस्व

Patil_p

पाकिस्तानी नागरिकांची आफ्रिदीला सणसणीत चपराक

Patil_p

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p
error: Content is protected !!