तरुण भारत

लॉकडाऊन वाढीची घोषणा आज?

मुख्यमंत्र्यांची ‘टास्क फोर्स’सोबत बैठक

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisements

कोरोना नियंत्रणासाठ्ना राज्यात 7 जूनपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. मात्र, कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर अपेक्षित प्रमाणात कमी न झाल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी बुधवारी कोरोनोची तिसरी लाट रोखण्यासंबंधी डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सची बैठक घेतली. यावेळी कोरोना नियंत्रणाबरोबरच राज्यात लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे  गुरुवारीच याबाबत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

या बैठकीत तज्ञ आणि मंत्र्यांनी 7 जूननंतर एक आठवडय़ांचा लॉकडाऊन वाढवावा असा सल्ला दिल्याचे समजते. दरम्यान, गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून यावेळीही लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री लॉकडाऊनवाढीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या बेंगळूरमधील शासकीय निवासस्थान ‘कावेरी’ येथील बैठकीत डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने कोरोना नियंत्रणासंबंधी महत्वाचे सल्ले दिले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी जिल्हय़ांमधील ऑक्सिजनसाठय़ावर लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱयांना दिली. केंद्र सरकारने ठरविलेल्या मार्गसूचीनुसार खेडय़ांमध्ये कोरोना नियंत्रणावर अधिक लक्ष केंद्रीत करणे, ब्लॅक फंगसचे प्रमाण वाढले असून त्यावरही नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिल्या.

तिसरी लाट रोखण्यासंबंधीही आढावा

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी हाती घ्यावयाच्या खबरदारी उपाययोजना, पायाभूत सुविधा आणि चिकित्सा सुविधा, आवश्यक असणारे मनुष्यबळ, औषधांचे वितरण आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी डॉ. देवीप्रसाद शेट्टी यांनी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासंबंधी आठवडाभरात टास्क फोर्सचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.

औद्योगिक क्षेत्राला मोकळीक शक्य

राज्यात कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले असले तरी काही क्षेत्रांवरील निर्बंध काही प्रमाणात शिथिल होणार आहे. औद्यौगिक क्षेत्राला आणखी सूट देण्यात येऊन आर्थिक स्थितीला सावरण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

दुसऱया पॅकेजबाबत उत्कंठा कायम

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दोन दिवसांपूर्वी दुसरी विशेष आर्थिक पॅकेज घोषित करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी पॅकेजची सरकारकडून घोषणा होईल, अशी चर्चा होती. तथापि, तशी घोषणा झाली नाही. त्यामुळे पहिल्या आर्थिक पॅकेजमध्ये समाविष्ट नसणाऱया समाजघटकांना गुरुवारी तरी पॅकेजची घोषणा होईल का, याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांवर बंदी : आरोग्यमंत्री

Abhijeet Shinde

धारवाड हद्दीत झालेल्या अपघातात ४ जण जागीच ठार

Abhijeet Shinde

ड्रग्ज प्रकरण: मंगळूर सीसीबीने टीव्ही अँकर अनुश्रीला बजावली नोटीस

Abhijeet Shinde

राज्यात रविवारी 20,378 नव्या रुग्णांची भर

Amit Kulkarni

विधानसभेत एकाच दिवशी 11 विधेयके सादर

Amit Kulkarni

कृष्णेच्या पाण्यासाठी संयुक्तपणे लढा

Patil_p
error: Content is protected !!